स्मार्टफोनची स्टोरेज सारखी फुल होतेय; या टिप्स वापरा

नवी दिल्लीः युजर्सना अनेकदा स्टोरेज फुलच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी युजर्स फोनमधील नको असलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतात. मात्र, ते तेवढ्यापुरतीच असतं. काही दिवसांनी पुन्हा स्टोरेज फुल्ल असा मेसेज फोनच्या स्क्रीनवर झळकतो. मग युजर्स थर्ड पार्टी स्टोरेज क्लीनर अॅपचा वापर करतात. काही दिवसांपुर्वीच समोर आलेल्या एका अहवालात काही स्टोरेज क्लीनर अॅप युजरचा डेटा चोरी करत असल्याच समोर आलं आहे. स्टोरेज क्लीनर अॅप न वापरताही तुम्ही स्टोरेजच्या समस्येवर मात करू शकता. जाणून घ्या या टिप्स... कॅशे क्लीयर करा कॅशे डेटा फोनमधील इंटरनल स्टोरेजची अधिक जागा व्यापतो. तसंच, फोनचा स्पीडही कमी होता. यासाठी वेळोवेळी कॅशे डिलीट करत राहा. स्मार्टफोनमधील सेटिंगमध्ये देण्यात आलेल्या स्टोरेज या पर्यावर क्लिक करुन प्रत्येक अॅपचा कॅश डेटा डिलीट करा. बॅकअप फोटो डिलीट करा फोनमध्ये काढलेले सर्व फोटोंचा गुगल बॅकअप घेत असतो. ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे. यामुळं तुमचे फोटो सुरक्षित आहेत व हरवण्याची भिती नसते. अनेकदा युजर्स फोटोंचा बॅकअप घेतल्यानंतरही फोनमध्ये सेव्ह करतात. अशामुळं फोनमधील स्टोरेज अधिक वापरण्यात येते. या परिस्थीतीत गुगलवर सेव्ह झालेले फोटो सिस्टम मेमरीतून डिलीट करा. गुगल फोटोमध्ये फ्री अप स्पेस पर्याय निवडून तुम्ही सगळे फोटो डिलीट करु शकता. पण, हे सगळे फोटो तुमच्या क्लाउड ड्राइव्हमध्ये सेव्ह राहतील. जंक फाइल्स डिलीट करा स्मार्टफोममधील जंक फाइल तातडीनं डिलीट करा. जंक फाइल डिलीट करण्याकरता गुगल फाइल्सची आवश्यकता भासेल. जंक फाइल्स कॅशे व डाउनलोड या दोन्ही ठिकाणी दिसत नसल्यामुळं ते पटकन लक्षात येत नाही. गुगल फाइल्स फोनमधील बनावट फाइल्स डिटेक्ट करून युजर्सना कोणत्या फाइल जास्त स्टोरेज घेतायेत हे सांगते. एसडी कार्डचा वापर करा तुम्ही स्मार्टफोनच्या इंटरनल स्टोरेजचा अधिक वापर करत असाल तर, तुम्ही एसडी कार्ड घेण्याचा विचार कराच. आजकाल सगळ्याच स्मार्टफोनमध्ये एसडी कार्डचा स्लॉट देण्यात येतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CEdcEC

Comments

clue frame