कोल्हापूर - पश्चिम घाटातील बेगोनिया प्रजातींचा अभ्यास करताना हंडीबडगनाथ (जि. बेळगाव, ता. खानापूर) येथे बेगोनियाची नवी जात आढळून आली आहे.
नवीन जातीच्या शोधाबाबतचा शोधनिबंध न्यूझीलंडमधून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्सा’ आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वनस्पतीचे नामकरण ‘बेगोनिया हंडीबडगनाथेंसिस’ असे तिच्या मूळ स्थानावरून केले आहे. भारतात ही एकमेव वनस्पती आहे, जिच्या पानांच्या बगलेत गुलिका अर्थात ट्युबरकल आहेत.
डॉ. मकरंद ऐतवडे, प्रा. डॉ. एस. आर. यादव व डॉ. एम. वाय. बाचूळकर यांनी त्याचा उलगडा केला आहे. डॉ. ऐतवडे पीएच.डी.साठी पश्चिम घाटातील बेगोनिया प्रजातींचा अभ्यास करताना त्यांच्यासह त्यांचे मार्गदर्शक वनस्पतीतज्ज्ञ डॉ. यादव व डॉ. बाचूळकर यांना हंडीबडगनाथ मठमध्ये ऑक्टोबर २०१४ ला बेगोनियाची एक जात आढळली.
वनस्पतीच्या सखोल अभ्यास करण्यात आला. त्यात ती भारतातील एकमेव वनस्पती असून, तिच्या पानांच्या बगलेत गुलिका अर्थात ट्युबरकल असून, ही जात नवीन आहे. तसेच पश्चिम घाटातीलच बेगोनिया डायपेट्याला जातीशी आप्तभाव दर्शवत असल्याचे आढळले.
बेगोनिया वनस्पतीची ही आहेत वैशिष्ट्ये
बेगोनिया हंडीबडगनाथेंसिस साधारणपणे १०० सेंटिमीटर उंच दगडांच्या फटींत वाढते. खोड नागमोडी, हिरवे असून त्यावर गुलाबी ठिपके असतात. पाने उपपर्णयुक्त असून ती लांबट-अंडाकृती, रोमयुक्त, कडा दंतूर असून, तळ तिरकस बादमकृती व टोके अणकुचीदार असतात. पानांच्या बगलेत गुलिका असतात. पुष्पविन्यास हा फांद्यांच्या बगलेत येतो. एकाच फुलोऱ्यात मोठी टपोरी फिकट गुलाबी रंगाची नर व मादी फुल येतात. नर व मादी फुलांत प्रत्येकी दोन गोलाकार, अखंड पाकळ्या असतात. नर फुलांत ५० ते ५५ पुंकेसर असतात. मादी फुलात तीन संयुक्त स्त्रीकेसर असून, ते तीन कप्पी असते. प्रत्येक कप्प्यांत अनेक बीजांड असतात. जायांगात अक्षलग्न अपरान्यास आढळतो. फळ पंखधारी संपुट प्रकारच आढळते. पंख असमान असतात. बिया सूक्ष्म व अभृणपोषी असून बाहेरील आवरण अलंकारिक असते.
संशोधनात डॉ. यू. एस. यादव, डॉ. नीता जाधव, अरुण जाधव व डॉ. एस. एस. कांबळे यांचे सहकार्य मिळाले.
अलीकडच्या काळात अनेक शोध
पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध आहे. अनेक नवीन वनस्पतींचे शोध अलीकडच्या काळात पश्चिम घाटामधून लागले आहेत.
- डॉ. एम. वाय. बाचूळकरबेगोनियाचे संवर्धन गरजेचे
शोभिवंत वनस्पतींत गणल्या जाणाऱ्या तसेच लुप्त होत चाललेल्या बेगोनियाच्या भारतीय जातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.
- डॉ. श्रीरंग यादवशोभिवंत वनस्पती म्हणून ओळख गरजेची
आजपर्यंतच्या इतिहासात भारतातील एकही बेगोनियाची जात शोभिवंत म्हणून व्यावसायिकदृष्ट्या प्रसिद्ध पावली नाही. बेगोनिया हंडीबडगनाथेंसिस वनस्पतीची फुले देखणी असून, नैसर्गिकरीत्या गुलिकांद्वारे तिचे सहज शासकीय प्रजजन होते. ती व्यावसायिकदृष्ट्या शोभिवंत म्हणून प्रसिद्धीस येऊ शकते. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- डॉ. मकरंद ऐतवडे.

from News Story Feeds https://ift.tt/2O2LkiO
Comments
Post a Comment