२ कोटी भारतीयांचा DTH सेवेला रामराम

नवी दिल्लीः टेलिव्हिजन आणि ब्रॉडकास्टिंग सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया () च्या घोषनेनंतर भारतात नवे दर लागू झाल्यानंतर डीटीएच सेवा महाग झाली आहे. डीटीएच सेवेसह केबलच्या बिलात भरमसाठ वाढ झाल्याने लोक हैराण झाले आहेत. ट्रायने लोकांना पसंतीचे चॅनेल निवडण्याची मुभा दिली असली तरी डीटीएच सेवा महाग झाल्याने देशभरातील तब्बल २ कोटी लोकांनी डीटीएच सेवा सोडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षीच्या केबल बिलात २५ टक्के वाढ झाली आहे. या दरवाढीविरोधात वेळोवेळी संताप व्यक्त केल्यानंतरही त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याने भारतीय डीटीएच आणि केबल सेवा सोडण्याला लोक पसंती देत आहेत. मार्च २०१७ मध्ये टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया ने ब्रॉडकास्टिंग आणि केबल सर्विस साठी नवीन फ्रेमवर्क तयार केला आहे. यात २९ डिसेंबर २०१८ ला लागू करण्यात आला. या नियमांनुसार ग्राहकांना आपल्या पसंतीचे चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना स्वस्त व कमी पैशांत डीटीएच सेवा व केबल सेवा मिळेल, असे मानले जात होते. परंतु, हे उलट झाले. आधी कमी पैशांत मिळणारी सेवा महाग होत अव्वाच्या सव्वा झाली. केबलच्या दरातही प्रचंड वाढ झाली. चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य असले तरी सेवा महाग झाल्याने गिऱ्हाईकांनी डीटीएच व केबलकडे पाठ फिरवली आहे. ट्रायच्या एका रिपोर्टनुसार, डीटीएच सर्विस सेवेचे कव्हरेज अॅक्टिव्ह सब्सक्राईबर बेस यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत जानेवारी-मार्चमध्ये जवळपास ७.२ कोटी गिऱ्हाईक होते. ३० जूनला संपलेल्या मागील तिमाहीपर्यंत यात २५ टक्के घसरण पाहायला मिळाली. जवळपास ५.४ कोटी अॅक्टिव्ह डीटीएच सब्सक्राईबर्स उरले आहे. क्रिसिल आणि केअर यांच्या रिपोर्ट्सनुसार टॅरिफ ऑर्डर लागू झाल्यानंतर बिल कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली आहे. अनेक गिऱ्हाईकांनी फ्रीडिशचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे छोट्या चॅनेलसारखे बिहारमधील दंगल टीव्ही एका रात्रीत सर्वात जास्त पाहणाऱ्या चॅनेलचा समावेश झाला आहे. दंगल या छोट्या चॅनेलने कलर्स, स्टार टीव्ही यासारख्या मोठ्या चॅनेलला मागे टाकले आहे. शहरी गिऱ्हाईकांनी डीटीएच केबलच्या ऐवजी ओव्हर द टॉप सर्विसला पसंत केले आहे. एमएक्स प्लेअर, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टार यासारख्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसला पसंत करण्याचे दिसत आहे. टाइम्स इंटरनेटच्या एमएक्स प्लेअरकडे सर्वात जास्त २१ टक्के गिऱ्हाईक आहेत. स्मार्ट टीव्ही सुद्धा स्वस्त झाले आहेत. त्यामुळे गिऱ्हाईक प्रोग्राम मोठ्या पडद्यावरही पाहू शकतात. जी इंटरटेनमेंटच्या झी५ अॅप, स्टार इंडियाचा हॉटस्टार आणि सोनीचा सोनी लिव ओटीटी सर्विसेसमुळे डीटीएचचे गिऱ्हाईक कमी झाले आहेत.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LNOuad

Comments

clue frame