नवी दिल्ली: हेरगिरीप्रकरणी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला उत्तर मागितलं आहे. इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून भारतीय आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याप्रकरणी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला ४ नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्यास बजावले आहे. भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची या धोकादायक स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचं व्हॉट्सअॅपने कबूल केल्यानंतर त्यांचा त्यावर खुलासा मागण्यात आला आहे. इस्त्रायलच्या स्पायवेअर पिगाससद्वारा भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात येत असल्याचं व्हॉट्सअॅपने गुरुवारी मान्य केलं होतं. तसेच हे टुल तयार करणाऱ्या एनएसओ ग्रुपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलं आहे. कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात एनएसओविरोधात खटला भरण्यात आला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या सर्व प्रकरणावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी प्रतिक्रिया देताना या घटनेच्या टायमिंगवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. व्हॉट्सअॅपने जर त्या लोकांशी आधीच संपर्क केला होता तर तेव्हाच त्याची माहिती का दिली नाही. ज्या लोकांची हेरगिरी करण्यात आलीय, त्यांना व्हॉट्सअॅपने मेसेज पाठविले आहेत. ज्यांची हेरगिरी करण्यात आली, त्यांची नावं जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही मालवीय यांनी केली. काय आहे प्रकरण हॅकर्सनी एक स्पायवेअर तयार केलं आहे ,ज्याच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपचा डेटा अॅक्सेस केला जातो. एका इस्त्रायली सॉफ्टवेअर कंपनीने हे स्पायवेअर डिझाईन केलं आहे. एनएसओ समूहाने Pegasus नावाचं हे टूल तयार केलं असून Google Drive किंवा iCloud चा डेटा अॅक्सेस करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर तुमचे फेसबुक मेसेंजरसुद्धा अॅक्सेस करू शकतं. एनएसओ समूहाने १,४०० यंत्रांमध्ये (मोबाइल) धोकादायक मालवेअर घुसवून संबंधित वापर कर्त्यांच्या व्हॉट्सअॅप उपयोजनांतील माहिती चोरली आहे. इस्रायली तंत्रज्ञान समूहाने काही मोबाइलधारकांची व्हॉट्सअॅप माहिती चोरून त्यांच्यावर पाळत ठेवली, असं व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनीही स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सअॅपचे एकूण १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. यात वापरकर्त्यांस व्हिडीओ कॉल येत असे व नंतर त्यातून मालवेअर व स्पायवेअर मोबाइलमध्ये सोडले जात असे. त्यामुळे कॉलला उत्तर देणेही वापरकर्त्यांस शक्य होत नसे. एनएसओ समूहाने संयुक्त अरब अमिरातीतील एका कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी मदत केली होती, पीगॅसस हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून सगळीच माहिती काढून घेते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2BVhmrc
Comments
Post a Comment