जिओच्या प्रीपेड रिचार्जवरही आता फुल टॉक टाइम नाही

नवी दिल्ली: सुरुवातीला मोफत कॉलिंगचे आमिष दाखवून ग्राहकांना भुलवलेल्या रिलायन्स जिओने आता हळूहळू एकेक धक्का द्यायला सुरुवात केली आहे. ऑउटगोइंग कॉलवर शुल्क लावल्यानंतर आता जिओने आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लानवर मिळणारं फुल टॉक टाइम बेनिफिटही बंद केलं आहे. ही सुरुवातीपासून कमी किंमतीत जास्त लाभ देणारी कंपनी म्हणून ओळखली जात होती. अशा परिस्थितीत पूर्ण टॉकटाइम बेनिफिट काढून टाकणे हा ग्राहकांसाठी धक्काच बातमी आहे. अलीकडेच, जिओने जाहीर केले की कंपनी आता इतर नेटवर्कवरील कॉलच्या बदल्यात ग्राहकांकडून इंटरकनेक्ट युसेज चार्जेस म्हणून प्रति मिनिट ६ पैसे दर आकारणार आहे. तेव्हापासून जिओच्या ग्राहकांसह दूरसंचार उद्योगात बरीच खळबळ उडाली आहे. या प्लान्सवर परिणाम जिओची १० ते १००० रुपयांदरम्यान टॉकटाइमची योजना आहे. टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तानुसार, या योजना पूर्वीही पूर्ण टॉकटाइमसह येत असत, परंतु आता त्यांना पूर्ण टॉकटाइम मिळणे बंद झाले आहे. आता जिओच्या १० रुपयांच्या टॉकटाइम रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना ७.४७ रुपयांचा टॉकटाइम देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २० रुपयांच्या रिचार्जमध्ये १४.९५ रुपये, ५० रुपयात ३९.३७ रुपये, १०० रुपयात ८१.७५ रुपये, ५०० मध्ये ४२०.७३ रुपये आणि १००० रुपयांच्या योजनेत ८४४.४६ रुपये टॉकटाइम देण्यात येणार आहे. हा जियोने लादलेल्या आययूसी म्हणजेच इंटरकनेक्ट युसेज चार्जेसचा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. आधी मिळायचा पूर्ण टॉकटाइम कंपनीकडून पूर्ण टॉकटाइम बेनिफिट रद्द केल्यामुळे जिओ ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. जिओ सुरुवातीपासूनच त्याच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये बर्‍याच योजना देत आहे. अनेक प्लान्समध्ये ग्राहकांना रिचार्जवर पूर्ण टॉकटाईम ऑफर केले गेले. ज्यांना अधिक व्हॉईस कॉलिंगची आवश्यकता होती अशा वापरकर्त्यांद्वारे पूर्ण टॉकटाइम प्रीपेड योजना खूप आवडल्या. या प्रीपेड टॉकटाइम योजनांमध्ये कोणताही डेटा दिला गेला नाही. जिओच्या योजनेत वेगवेगळे आययूसी पर्याय जिओच्या योजनांमध्ये गंमतीशीर बाब ही आहे की आता वेगवेगळ्या डेली डेटा लिमीटसह लोकप्रिय डेटा योजना आययूसी टॉक टाइम व्हाउचरसह येत आहेत. यात युजर्सना प्रीयुपेड डेटा रिचार्ज सोबत आययूसी रिचार्जचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. इंटरकनेक्ट युसेज चार्ज म्हणजे काय? इंटरकनेक्ट युसेज चार्ज याच्याशी हे प्रकरण जोडलेले आहे. आययूसी एक मोबाइल टेलिकॉम ऑपरेटर आहे. जे दुसऱ्याला दिली जाणारी रक्कम आहे. ज्यावेळी एक टेलिकॉम ऑपरेटरचे ग्राहक दुसऱ्या ऑपरेटरच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल करतात. त्यावेळी आययूसीची रक्कम कॉल करणाऱ्या ऑपरेटरला द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या नेटवर्क दरम्यान कॉल मोबाइल ऑफ-नेट कॉलच्या रुपात ओळखली जाते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडून यासंबंधीचे शुल्क ठरवले जातात. सध्या याचे दर ६ पैसे प्रति मिनिट इतके आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MDLCM4

Comments

clue frame