पुणे : चंद्राभोवती फिरणाऱ्या 'ऑर्बाटर'ने काढलेल्या छायाचित्रावरून लँडर "विक्रम'ची कोणतीही मोडतोड झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे जरी असले तरी अजून त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क प्रस्थापित झाला नसल्याचे इस्रोच्या वतीने सांगण्यात आले आहे. हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी ऑर्बायटरला चांद्रभुमीच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऑर्बायटरची भ्रमनकक्षा कमी करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ऑर्बाटर चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर अंतरावर भ्रमन करत आहे.
'चांद्रयान-2'चा महत्त्वपूर्ण भाग असलेला 'ऑर्बायटर'हा चंद्राभोवती फिरणारा कृत्रीम उपग्रह आहे. चंद्रावर उतरलेला लॅंडर विक्रम आणि पृथ्वीवरील इस्रोचे मुख्यालय यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी म्हणून तो काम करतो. सध्या 'ऑर्बायटर' आणि लँडर विक्रमचा संपर्क तुटला आहे. पण 'ऑर्बायटर' आणि इस्रो एकमेकांच्या संपर्कात आहे. त्यामुळे विक्रमशी संपर्क करण्यासाठी चंद्राचा कृत्रीम उपग्रह असलेला ऑर्बायटर हा एकमेव माध्यम आहे. तसेच ऑर्बायटरवर विविध उपकरणे बसविण्यात आली आहे. ज्यांच्या द्वारे चंद्राच्या दक्षिण धृवाचा अभ्यास करण्यात येणार आहे.
लँडर 'विक्रम'शी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्त्रोकडे पुढील 12 दिवस उरले आहे. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र होईल आणि तेथील तापमान उणे 232 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. अशा तापमानात लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रग्यान' काम करू शकत नाही. चंद्राच्या अधिक जवळ जाऊन छायाचित्रांची स्पष्टता वाढवता येईल तसेच 'ऑर्बायटर' जो चंद्राभोवती फिरतोय त्यातून देण्यात येणारे सिग्नल अधिक तीव्रतेने विक्रमच्या दिशेने सोडता येतील. लँडर विक्रमच्या चारही पायांची स्थिती अधिक स्पष्टपणे कळण्यास मदत होईल.

from News Story Feeds https://ift.tt/2UFdGT8
Comments
Post a Comment