गेल्या ६० वर्षात ६० टक्के चांद्रमोहिमा अयशस्वी

नवी दिल्ली : मोहिम अयशस्वी झाल्याने भारतीयांचा हिरमोड झाला आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, या मोहिमेत नेमकी चूक कोठे झाली. मात्र, अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार गेल्या ६० वर्षात ६० टक्केच चंद्रमोहिमा यशस्वी झाल्या आहेत. गेल्या ६० वर्षात एकूण १०९ मोहिमा करण्यात आल्या. त्यापैकी ६१ मोहिमा यशस्वी झाल्या तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्याचं नासाच्या अहवालावरून स्पष्ट होतं. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोची चांद्रयान-२ अंतर्गत चंद्रावर विक्रम लँडर उतविण्याची मोहिम शनिवारी पूर्ण होऊ शकली नाही. लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. यातील पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. इस्त्रायलनेही फेब्रुवारी २०१८ मध्ये चंद्रमोहिमेला सुरुवात केली होती. पण त्यानंतर ती रद्द झाली. नासाने दिलेल्या माहितीनुसार, १९५८ ते २०१९ पर्यंत भारतासोबतच अमेरिका, रशिया, जपान, युरोपीय देश, चीन आणि इस्त्राइलने वेगवेगळ्या चंद्र मोहिमा सुरू केल्या. पहिली चांद्र मोहिम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ मध्ये केली पण पायोनिअरचे उड्डाण अयश्स्वी झाले. पहिली यशस्वी ४ जानेवारी १९६९ मध्ये रशियाची लूना-१ होती. हे यश रशियाला सहाव्या मोहिमेत मिळाले. ऑगस्ट १९५८ पासून नोव्हेंबर १९५९ पर्यंत अमेरिका आणि रशियाने १४ चंद्रमोहिमा केल्या. यात फक्त लूना-१, लूना-२ आणि लूना-३ या तीन मोहिमांना यश मिळालं. या सर्व मोहिमा रशियाने सुरू केल्या होत्या. जपान, रशिया, चीन, भारत आणि इस्त्राइल या देशांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. जपानने १९९० मध्ये पहिली चांद्रमोहिम हिटेन लाँच केली होती. सप्टेंबर २००७ मध्ये जपानने आणखी एक ऑर्बिटर मोहिम सेलेन लाँच केली होती. वर्ष २००० ते २००९ या दरम्यान आतापर्यंत ६ लुनार मोहिमा लाँच केल्या. युरोप (स्मार्ट-१), जपान (सेलेन) , चीन (शान ई १), भारत (चंद्रयान) आणि अमेरिका (लुनार). २००९ ते २०१९ या दरम्यान दहा मोहिमा लाँच करण्यात आल्या. यात भारताच्या ५, तीन अमेरिका, चीन आणि इस्रायलच्या प्रत्येकी एक-एक मोहिमेचा समावेश होता. १९९० पासून आतापर्यंत अमेरिका, भारत, जपान, रशिया , चीन आणि इस्त्राइल यांनी १९ चंद्रमोहिमा केल्या आहेत.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/316OtmU

Comments

clue frame