आता नासाचा ऑर्बिटर घेणार विक्रम लँडरचा शोध

नवी दिल्लीः चांद्रयान मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या लँडरचा संपर्क तुटल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या () मदतीला अमेरिकेची नासा संस्था धावून आली आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला नासाचा आता विक्रमचा शोध घेणार आहे. विक्रम लँडरशी ज्या ठिकाणी इस्रोचा संपर्क तुटला, त्या ठिकाणावरून नासाचा ऑर्बिटर मंगळवारी जाणार आहे. ऑर्बिटरमधून काढण्यात येणारी छायाचित्रे इस्रोकडे सोपवण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. त्यावरून विक्रमची नेमकी स्थिती काय आहे ते समजू शकेल. इस्रोनेही विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून काढला असून, नासाच्या मदतीने विक्रम लँडरशी संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. नासाच्या ऑर्बिटरने यापूर्वी चंद्रावरील अनेक घडामोडी सूक्ष्मपणे टिपल्या आहेत. नासाच्या या ऑर्बिटरमध्ये हाय रेझोल्युशन कॅमेरा बसवण्यात आला असून, ४० वर्षापूर्वीच्या अपोलो मिशनमधील चंद्रावरील मानवी पाऊल खूणाही या ऑर्बिटरने कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद केल्या आहेत. जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याच्या प्रक्रियेत असताना २.१ कि.मी.अंतरावर त्याचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला. विक्रमने चंद्रावर सॉफ्टऐवजी चंद्रावर हार्ड लँडिंग केले. यानंतर नासानेही पुढाकार घेत इस्रोशी मदत करण्याचा निर्णय घेतला.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2AieAve

Comments

clue frame