मुंबई : मोबाईल आणि लॅपटॉपवरील प्रत्येक गोष्टीसाठी आजच्याघडीला अकाउंटची गरज भासते. यूजर्सला फायदेशीर असणाऱ्या अनेक सेवा गुगलकडून पुरवल्या जातात. या सेवा पुरवताना यूजरचा डेटा गुगल अकाउंटवर साठवला जातो आणि अॅक्टिव्हिटींची नोंदही केली जाते. पण यूजरचा मृत्यू झाल्यानंतर या अकाउंटचं आणि त्यावरील डेटाचं काय होत असेल, हा प्रश्न अनेकांच्या मनात देखील येत नाही. खरतंर, याबाबत निश्चिंत राहायला हरकत नाही. कारण, यूजरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं अकाउंट आपोआप बंद करायची सोय गुगलवर करण्यात आली आहे. यूजरचे ठराविक काळापर्यंत वापरण्यात आले नाही; तर, त्यानंतर यूजरने निवडलेल्या १० जणांना अकाउंट इनअॅक्टिव्ह असल्याची सूचना दिली जाईल. हा कालावधी ३ ते १८ महिने इतका असू शकतो. त्यानंतर यूजरने केलेल्या सेटिंगनुसार त्या १० जणांना डाटा डाऊनलोड करण्याची मुभा दिली जाईल. अकाउंट बंद असताना येणाऱ्या ई-मेल्ससाठी ऑटोमॅटिक रिप्लाय देण्याची सुविधा गुगलवर उपलब्ध आहे. यूजरच्या मृत्यूनंतर अकाउंट बंद करण्यासाठी पुढे दिलेल्या काही सोप्या स्टेप्स - गुगलवर साइन इन करून माय अकाउंट वर जावे. येथे डेटा अॅण्ड पर्सनलाईझेशन हा पर्याय असेल; तो निवडावा. त्यानंतर Download, Delete किंवा make a plan for your data असे तीन पर्याय दिसतील. - येथील तिसरा, make a plan for your data हा पर्याय निवडावा. त्यानंतर इनअॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर ही विंडो उघडली जाईल. तेथे Change This Setting हा पर्याय निवडावा. - आता ऑटो डिलिटिंग प्रक्रिया चालू करण्यासाठी स्टार्ट हा पर्याय निवडावा. आता अकाउंट बंद असण्याचा कालावधी निवडावा लागेल. ३ ते १८ महिने या पैकी एक पर्याय निवडावा लागेल. या ठिकाणी यूजरला फोन नंबर, ई-मेल अॅड्रेस आणि रिकव्हरी ई-मेल अशी माहिती पुरवावी लागेल. - यानंतर ज्यांना सूचना जायला हवी; अशा १० जणांची नावे निवडावी. - यापुढे गुगल अकाउंटचं ऑटो डिलिशन मान्य करावं लागेल. 'Yes, delete my ' हा पर्याय निवडावा. यूजरचं इनअॅक्टिव्ह गुगल अकाउंट बंद करावे याची मान्यता हा पर्याय घेतो. - यानंतर review plan हा पर्याय निवडून एकदा संपूर्ण प्रक्रियेची फेरतपासणी करावी. मग confirm वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2yHYx9y
Comments
Post a Comment