बेंगळुरू: व्हॉट्सअॅप एंड टू एंड एन्क्रिप्शनवर काम करतो. म्हणजेच व्हॉट्सअॅपचे चॅटिंग कंपनी किंवा एखादी एजन्सी अथवा दोघांव्यतिरिक्त तिसरी व्यक्ती वाचू शकत नाही. मूळ मेसेज ट्रेसही करता येऊ शकत नाही. पण आता व्हॉट्सअॅपवरील मूळ मेसेज ट्रेस करता येऊ शकतो, असा दावा आयआयटी मद्रासच्या प्राध्यापकानं कोर्टात केला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये मेसेज पाठवणाऱ्याला ट्रेस करता येऊ शकतं अशा प्रकारचे टूल कंपनीने तयार करावं, असं भारत सरकारनं अनेकदा व्हॉट्सअॅप कंपनीला सांगितले आहे. बोगस वृत्त आणि अफवांवर नियंत्रण आणणे हा त्यामागील उद्देश आहे. मात्र, हे शक्य नाही, असं व्हॉट्सअॅपनं सांगितलं आहे.आता व्हॉट्सअॅपवरील मूळ मेसेज ट्रेस करता येणं तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचा दावा आयआयटी मद्रासचे प्राध्यापक व्ही. कमाकोटी यांनी मद्रास हायकोर्टात केला आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेजमध्ये आयडेंटिफिकेशन टॅग लावता येऊ शकतो. त्यामुळे मूळ स्त्रोत कळू शकतो, असं प्रा. कमाकोटी यांचं म्हणणं आहे. त्यावर कोर्टाच्या आदेशानुसार तांत्रिकदृष्ट्या मूळ मेसेज ट्रेस करणं कसं शक्य आहे, यासंबंधीचा अहवाल त्यांनी कोर्टात सादर केला आहे. मेसेजमध्ये आयडेंटिफिकेशन कोड अॅड करण्यात यावा, तसंच व्हॉट्सअॅपने मेसेज 'फॉरवर्डेबल' आणि 'नॉट फॉरवर्डेबल' असे नवीन फीचर आणावे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TdzNzf
Comments
Post a Comment