'इस्रो'चे संस्थापक डॉ . विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली

मुंबई: भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक, 'इस्रो'चे संस्थापक दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात १२ ऑगस्ट, १९१९ रोजी अंबालाल आणि सरलाबेन या दाम्पत्याच्या पोटी झाला होता. विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांच्या घरीच झाले. आईने सुरू केलेल्या शाळेत ते शिकले. गुजरातमध्ये १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन नंतर ते इंग्लंडला रवाना झाले. केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक या विषयातील परीक्षा उतीर्ण झाले. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्याने साराभाई भारतात परतले आणि त्यांनी बंगळुरू येथील ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी.वि.रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्मिक किरणांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, विक्रम साराभाई स्पेस सेंटर... देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत विक्रम साराभाई यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी १९६२ साली शांती स्वरूप भटनागर पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांनी ३० डिसेंबर १९७१ ला अखेरचा श्वास घेतला.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33russF

Comments

clue frame