काय असतो ओटीपी फ्रॉड? बचावासाठी 'हे' करा

नवी दिल्लीः भारतात डिजिटल पेमेंट पद्धतीने व्यवहार करण्याचं प्रमाण वाढत आहे. खासकरून, पेटीएम आणि भीमअॅप सारखे यूपीआय प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाल्यामुळे ओटीपीच्या सहाय्याने डिजिटल व्यवहार करणं सहज शक्य होतं. मात्र, याचसोबत फसवणूक झाल्याच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते. विशेषतः डिजिटल व्यवहारांची सवय नसणाऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे असा 'ओटीपी' फ्रॉड होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे. '' म्हणजे काय? डिजिटल पद्धतीने व्यवहार करताना सुरक्षेच्या कारणास्तव यूजरच्या मोबाईलवर ओटीपी अर्थात पाठवला जातो. हा पासवर्ड कन्फर्म केला, तरच व्यवहार पूर्ण होतो. म्हणूनच ओटीपी कोणाशीही शेअर करू नये, अशी सुचना यूजरला दिली जाते. काही वेळा नव्याने डिजिटल व्यवहार करणाऱ्या लोकांकडून ओटीपीची माहिती काढली जाते आणि पैशांची चोरी केली जाते. यालाच 'ओटीपी फ्रॉड', असं म्हणतात. 'अशी' घ्यावी खबरदारी? ओटीपी फ्रॉडच्या माध्यमातून खूप मोठी रक्कम लंपास जाऊ शकते. हे टाळण्सासाठी खालील ५ गोष्टी लक्षात ठेवाव्यात - ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. मोबाईल, ई-मेल किंवा अन्य कुठेही आलेला ओटीपी कधीही कोणालाही सांगू नये. अनेकदा यूजरचं खातं असलेल्या बॅंकेत ओटीपी हवा आहे, असं खोटं सांगून ओटीपी मागितला जातो. पण खरी गोष्ट अशी की, बॅंकेतही कधीही कोणत्याही खातेदाराचा ओटीपी लागत नाही. पेमेंट करताना सतर्क रहा ओटीपीच्या माध्यमातून व्यवहार करताना नेमका किती रुपयांचा व्यवहार केला जात आहे, याकडे लक्ष ठेवावे. ज्या पेजवर ओटीपी टाकला आहे, त्या पोजचा सोर्स आणि मर्चंट विश्वसनीय आहे ना, याची खात्री करावी. काहीही गडबड वाटल्यास लगेचच पेमेंट रद्द करावे. पैसे स्विकारताना ओटीपी लागत नाही. ओटीपी फक्त पैसे देताना लागतो. पैसे स्विकार करणाऱ्या माणसाला ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा नव्या यूजरला पाठवलेले पैसे स्विकारण्यासाठी ओटीपी लागतो, असं खोटं सांगूनही ओटीपी उकळला जातो. मात्र, जो यूजर पैसे पाठवणार आहे, फक्त त्याच्याच मोबाईल नंबरवर ओटीपी येतो, हे नेहमी लक्षात ठेवावे. फक्त अधिकृत स्रोतांचाच वापर करावा. पैसे भराताना फक्त अधिकृत अॅप्स किंवा वेबसाइटचाच वापर करावा. वेबसाईट अथवा अॅप अधिकृत नसेल, तर ओटीपी ट्रॅक करून पैशाची चोरी केली जाते. ओटीपीशिवाय यूजरची खासगी माहितीही अश्या अॅप्समधून लिक होते. अधिकृत कस्टमर केअरशीच संपर्क करावा. बॅंक खाते किंवा डिजिटल व्यवहारासंबंधी काहीही शंका असल्यास नेहमी अधिकृत कस्टमर केअरशीच संपर्क करावा. अनाधिकृत नंबरशी संपर्क झाल्यास डाटा चोरी केला जाऊ शकतो. अनेक वेळा गुगलवर खोटे कस्टमर केअर नंबर लिहिलेले असतात.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MP5ygO

Comments

clue frame