मुंबई ऑनलाइनच्या काळात इंटरनेटफ्रेंडली असणे चुकीचे नाही. मात्र, आपली माहिती सर्वांकरीता, त्रयस्थांसाठी आहे असे बिलकूलच नाही. आपल्या माहितीचा, डेटाचा दुरुपयोग होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे. गुगलमधील काही सेंटिंग्जमध्ये बदल केल्यास आपली माहिती खासगी राहू शकते. जेणेकरून डेटा ट्रॅकिंगला काही प्रमाणात रोखता येईल. >> ई-मेल ट्रॅकिंग ब्लॉक करा तुमच्या जीमेल अकाउंटवर जा. उजवीकडे वरील बाजूस सेटिंग्स पर्याय निवडा. त्यानंतर तिथे इमेज यामध्ये जाऊन "Ask before displaying external images." हा पर्याय निवडा आणि बदल सेव्ह करा. यातून आपला मेल ट्रॅक होणे बंद होईल. >> लोकेशन ट्रॅकिंग थांबवागुगलमध्ये लोकेशन हिस्ट्री मध्ये आपण कधी, कुठे, केव्हापर्यंत होतो आदीबाबतची सगळी इत्यंभूत माहिती उपलब्ध होते. त्याशिवाय आपण निवडलेले ठिकाण, हॉटेल, जेवण, वस्तू यांच्या आधारे पुढील वेळी आपल्याला काही ठिकाणे, हॉटेल्स सुचवतो. एकप्रकारे गुगलचे आपल्या आवडीनिवडीवरही लक्ष असून अप्रत्यक्ष हस्तक्षेप असतो. गुगल होम पेजवर वर्तुळाकार मध्ये असलेल्या गुगल अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर Google Account > Data & personalization> Location History> वर जा. त्यानंतर टुगलवरील Paused पर्यायावर क्लिक करा व सेव्ह करा. >> व्हाइस रेकोर्डिंग थांबवा - गुगलला सर्व माहिती असते. गुगल अस्टिटंट वापरताना गुगल आपल्याकडून आपला आवाज आणि इतर ऑडिओ रेकोर्ड करण्यात येतात. गुगलने तुमचा आवाज रेकोर्ड करून सेव्ह करणे थांबवावे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही थांबवू शकता. Data & personalization या पर्यायावर पुन्हा जा. तिथे Voice & Audio Activity वर क्लिक करा आणि पुन्हा टूगल Paused करा. >> Purchase history डिलीट करा - गुगलच्या गुगल प्ले स्टोर, गुगल एक्स्प्रेस, गुगल अस्टिटंट आदींचा वापर आपण करत असतो. यामध्ये आपण काय केले, याची माहिती नमूद असते. ही माहिती आपण डिलीट करू शकतो. त्यासाठी जीमेल अकाउंटमध्ये जाऊन https://ift.tt/2MiUd9W मध्ये जा. तिथे REMOVE PURCHASE > VIEW EMAIL > More>Delete this message असा पर्याय निवडावा. >> गुगलला करा बाय बाय - गुगल हे सर्च इंजिन छोट्यामोठ्या गोष्टींसाठी वापरले जाते. त्यामध्ये आपली माहिती सेव्ह होत असते. ही माहिती गुगलने वापरू नये यासाठी गुगल वापरणं सोडून द्या. गुगलऐवजी DuckDuckGo हे सर्च इंजिन वापरा. यामध्ये तुमची कोणतीही माहिती ट्रॅक केली जात नाही. गुगल अकाउंटशिवाय इतर कामासाठी वापरण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. >> टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा - तुमचे अकाउंट हॅक होऊ नये, यासाठी हा चांगला पर्याय आहे. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी Security > 2-Step Verification > re-enter your password > असा पर्याय निवडून पुढे दिलेल्या सूचनांनुसार क्लिक करा.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30Rwy2X
Comments
Post a Comment