पुणे : भारतातून बुधवारी (ता.17) पहाटे दीड वाजता खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार एक वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. संपूर्ण देशात सुरवातीपासून शेवटपर्यंत हे ग्रहण दिसेल. केवळ अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत दूरवरच्या ईशान्येकडच्या भागात ग्रहण सुटतांनाची स्थिती दिसू शकणार नाही. असे भूविज्ञान मंत्रालयाने कळविले आहे.
पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात होईल. खंडग्रास चंद्रग्रहणाचा परमोच्च बिंदू 3 वाजून 1 मिनिटांनी असेल. या क्षणी चंद्राचा अर्ध्याहून अधिक भाग पृथ्वीच्या छायेने झाकलेला असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार 4 वाजून 30 मिनिटांनी हे ग्रहण सुटेल.
ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ईशान्य आशिया वगळता आशियाचा इतर भाग, उत्तर स्कँडेव्हिया वगळता युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागात ग्रहण दिसेल. ग्रहणाचा एकूण अवधी 2 तास 59 मिनिटे असेल.
चंद्रग्रहण कसे होते
अवकाशात भ्रमण करणाऱ्या सूर्य आणि चंद्र यांमध्ये पृथ्वी आली की पृथ्वीवर चंद्रग्रहण दिसते. या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे जिथे रात्र आहे तिथे हे ग्रहण दिसते. खंडग्रास चंद्रग्रहणात पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा अर्धाच भाग झाकला जातो. तर कंकणाकृती ग्रहणात चंद्राचा संपूर्ण भाग झाकला जातो.

from News Story Feeds https://ift.tt/2lyEBTf
Comments
Post a Comment