पुणे : पृथ्वीवरील तसेच ब्रम्हांडात आढळणाऱ्या सर्वोच्च 'ऊर्जा' असलेल्या कणांचे रहस्य उलगडण्यास पुण्यातील संशोधकांना यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'भौतिकशास्त्र विभागा'तील डॉ. सुरजित पॉल यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या समूहाने ही कामगिरी बजावली. आंतरविद्यापीठीय खगोलभौतिकी आणि खगोलशास्त्र केंद्र (आयुका) आणि जर्मनीतील वैज्ञानिकांच्या सहयोगातून हे संशोधन करण्यात आले. लंडनच्या 'रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी'च्या शोधपत्रिकेत नुकता हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.&
ब्रम्हांडात दोन महाकाय 'आकाशगंगा समूह' (क्लस्टर्स) एकत्र आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते. हीच ऊर्जा 'कॉस्मिक रे' म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते, तिची निरीक्षणे कशी घेता येतील याबद्दल जगातील शास्त्रज्ञ अनभिज्ञ होते. परंतु डॉ. पॉल यांच्या संशोधनाने हे सर्व प्रश्न निकालात काढले आहे.
शोधाबद्दल सांगताना डॉ. पॉल म्हणाले, ''दोन क्लस्टर्सच्या संयोगातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा प्रक्रियांचा अभ्यास करणे उपलब्ध संसाधनांनी शक्य नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत होते. परंतु संगणकीय गणिती प्रक्रियेने हे रहस्य उलगडण्यास आम्हाला यश आले आहे. या शोधामुळे क्लस्टर मधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जा किरणांतील बदलांचा आणि पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वोच्च उर्जावान कणांचा अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया निर्माण करायला शास्त्रज्ञांना मार्गदर्शन मिळणार आहे.''
या संशोधनामुळे पृथ्वीवर येणाऱ्या कॉस्मिक रेज अर्थात सवोच्च उर्जावाण कणांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. तसेच ब्रम्हांडातील सर्वाधिक शक्तिशाली ऊर्जा प्रवेगकाचे रहस्य शास्त्रज्ञांसमोर आले आहे. डॉ. पॉल यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. रिजू सॅमजॉन, जर्मनीतील डॉ. ल्युईजू यापीचिनी, डॉ. कार्ल मॅनहाईन आणि आयुकातील अत्याधुनिक संगणक प्रणालीचा या संशोधनात सहभाग आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2LGWue6
Comments
Post a Comment