अॅप्स चोरतायेत तुमचा खासगी डेटा; असा ठेवा सुरक्षित

नवी दिल्ली ऑनलाइन खरेदी असो किंवा ऑनलाइन बिल भरणे यासाठी सर्रास अॅपचा वापर केला जातो. इन्स्टॉल करताना युजर्स लगेचच काही माहिती देतात. पण, यामुळं युजर्सचा खासगी डेटा चोरी होण्याची शक्यता असते. युजर्सचा खासजी डेटा चोरी करण्यासाठी हॅकर्स सारख्या अॅप्सना लक्ष्य करतात आणि त्यामुळंचं युजर्सच्या सर्च हिस्ट्रीच्या आधारे होम पेजवर जाहिराती दाखवतात. जेणेकरून युजर्स त्या जाहिरातींकडे आकर्षित होऊन त्यावर क्लिक करतील. आपला डेटा सुरक्षित कसा राखावा यासाठी काही टिप्स... अॅप्सना परवानगी देणं टाळा अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते अॅप्स तुमच्याकडे कॅमेरा, लोकेशन आणि फोटोचा अॅक्सेस मिळावा यासाठी परवानगी मागतात. तसंच काही अॅप्स तुमच्या मायक्रोफोनचा अॅक्सेस मागतात, या अॅक्सेसच्या आधारे ते तुमचं खासगी बोलणं त्यांच्यापर्यंत पोहचू शकते. जर तुम्ही डाऊनलोड केलेलं अॅपदेखील अशीच परवानगी मागत असेल तर परवानगी नाकारा. त्यानंतरही ते अॅप व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला पर्याय म्हणून दुसरं अॅप डाउनलोड करा. गुगलनं अपडेटेड प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पॉलिसीची घेषणा केली आहे. गुगल लवकरच अँड्रोइड व्हर्जन क्यू लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळं युजर्सचा डेटा सुरक्षित राखण्यास मदत होणार आहे. परवानगी टाळण्यासाठी >>सर्वात पहिलं तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा >>त्यानंतर अॅप्स हा पर्याय निवडा >>एखादे अॅप निवडा >>त्यानंतर परमिशन सेक्शनमध्ये जा >> अॅपसाठी जी परवानगी द्यायची आहे तिथं हो किंवा नाही हा पर्याय निवडा


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2K6alHO

Comments

clue frame