पुणे : 'इस्त्रो'च्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' मोहिमेचे नुकतेच यशस्वी प्रक्षेपण झाले. 'इस्रो' आता थेट सुर्यावर स्वारी करणाऱ्या 'आदित्य एल-1' या मोहिमेच्या तयारीत आहे. त्यासंबंधीची बैठक नुकतीच पार पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिनच्या वापराने 'भूस्थिर उपग्रह प्रक्षेपका'चे (जीएसएलव्ही) यशस्वी उड्डाण केले आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणाने पुन्हा एकदा 'जीएसएलव्ही'च्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
'आदित्य एल-1' ही मोहिमेचे पुढच्याच वर्षी सुरवातीच्या महिन्यात प्रक्षेपीत करण्यात येणार आहे. सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या बद्दल बोलताना इस्रोचे अध्यक्ष के. सिवान म्हणाले, "आमच्या मोहिमेत पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर असलेला सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करण्यात येणार आहे. कारण पृथ्वीवरील वातावरणीय बदलामध्ये हाच घटक मोठी भूमिका बजावतो.'' अजूनही सूर्याची बाह्यतम कक्षा असलेल्या प्रभामंडळाचे तापमान कसे वाढते या बद्दल शास्त्रज्ञ अनभिज्ञच आहे. सूर्याची नवीन रहस्ये शोधण्यासाठी 'आदित्य' लवकरच हनुमान उडी घेत इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा कुरा खोवनार आहे.
आदित्य एल-1 मोहीम :
- 'आदित्य' मध्ये 400 किलोग्रमचा उपग्रह आणि सात उपकरणे पाठविण्यात येणार.
- प्रक्षेपकाने पृथ्वीपासून 800 किमी अंतरावर 'आदित्य' पाठविण्यात येणार. पुढचा प्रवास तो गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे निर्माण होणाऱ्या वेगावर करणार
- सहा हजार केल्विन तापमान असणाऱ्या सूर्याच्या बाह्यतम प्रभामंडळाचा करणार अभ्यास
- सुर्यातुन बाहेर पडणाऱ्या अतिनील आणि क्ष-किरणांचा होणार अभ्यास
- सुर्याभोवतीचे चुंबकत्व बदलाचा अभ्यास करण्यात येणार
आदित्य एल-1 मोहिमेत वापरण्यात येणारी उपकरणे :
- व्हीजीबल इमीशन लाइन कोरोनाग्राफ ः प्रभामंडळाचा अभ्यास, भारतीय अवकाशविज्ञान संस्थेची निर्मिती
- सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप : 200-400 नेनोमीटरच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा अभ्यास, आयुका पुणे ची निर्मिती
- आदित्य सोलार विथ पार्टिकल एक्सपिरीमेंट : सौर वादळांचा अभ्यास, भौतिकी प्रयोगशाळा (पीआरएल)
- प्लाझ्मा ऍनलायझर पॅकेज फॉर आदित्या : सौर वादळाच्या ऊर्जा बदलाचा अभ्यास, स्पेस फिजिक्स लॅबरोटरी.
- सोलर लो एनर्जी स्पेक्ट्रोमिटर : क्ष- किरणांचा अभ्यास, इस्रो उपग्रह केंद्र
- हाय एनर्जी एल-1 ऑब्रीटींग एक्स रे स्पेक्ट्रोमीटर : सौरवादळातून बाहेर पडणाऱ्या प्लाझ्मा लहरींचा अभ्यास, उदयपूर सोलर ऑब्झरवेटरी
- मॅग्नोटोमिटर : चुंबकीय बदलाचा अभ्यास, लॅबरोटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टिम

from News Story Feeds https://ift.tt/2y1BwxU
Comments
Post a Comment