१४ वर्षांच्या मुलाकडून अतिधोकादायक व्हायरसची निर्मिती

मुंबई : हॅकींगच्या क्षेत्रात थैमान घालणारं '' हा व्हायरस तंत्रज्ञानातील अभ्यासकांना अजूनही चांगलंच लक्षात असेल. अशाच प्रकारचा आणखी एक व्हायरस एका १४ वर्षांच्या मुलाने तयार केला असून '' असं या व्हायरसचं नाव आहे. 'ब्रिकरबॉट' या मालवेअर ने दिल्लीतील 'एमटीएनएल ब्रॉडबँड सर्व्हिस'वर हल्ला चढवून जवळपास ६०,००० बीएसएनएल मोडेम्स आणि राउटर्स वर हॅक केल्याची घटना २०१७ साली उघडकीस आली होती. अशाच प्रकारचा, किंबहूना याहून जास्त तिव्रतेचा हल्ला 'लाइट लिफोन'कडून होणार असल्याचं अभ्यासकांकडून सांगितलं जात आहे. या नव्या मालवेअरच्या सहाय्याने स्मार्ट आयओटी डिव्हाइसेसचं नुकसान करता येणं सहज शक्य होईल. व्हायरसमुळे आयओटी डिव्हाइसेसच्या स्टोरोजमध्ये साठवलेला डाटा क्षणार्धात पुसुन टाकता येतो. शिवाय, हा व्हायरस डिव्हाइसचं नेटवर्क कन्फिगरेशंस बंद करुन डिव्हाइसच्या फायरवॉल रूल्सला निकामी करतो. याने डिव्हाइस 'किल' किंवा 'ब्रेक' होतो. त्यामुळे एक डिव्हाइस एकदा हॅक झाला की त्याचा काहीही उपयोग रहात नाही. या हल्लापासून वाचण्यासाठी डिव्हाइसला फर्मवेयरपासून लांब ठेवून परत एकदा इंस्टॉल करावं लागतं. ही प्रक्रिया यूजर्ससाठी खूप क्लिष्ट आणि बहूतेक वेळा आकलना पलिकडचीही असते. त्यामुळे डिव्हाइसच्या हार्डवेअरमध्ये सुधारता येणार नाही अशी गडबड झाली आहे, असे वाटून यूजर्स ते डिव्हाइस अक्षरश: फेकून देतात. 'अकामाई' चे संशोधक यांनी या व्हायरसचा छडा लावला. ब्रिकरबॉट सॉफ्टवेअर वरच हे नवं मालवेअर आधारीत असून एका १४ वर्षाच्या मुलाकडे ही क्षमचा असणं हे आश्चर्यकारक आणि तितकच धोक्याचंही आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JoJI0z

Comments

clue frame