कोल्हापूर - आपल्याला नेहमी सोबत करणारी आपली सावली अचानक साथ सोडून गेली तर? असे शक्य आहे का? याचा अनुभव आज येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील फिजिक्सच्या विद्यार्थांनी घेतला. येथील श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्यामध्ये या विद्यार्थांनी हा शून्य सावलीचा प्रयोग प्रत्यक्षात अनुभवला. प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे जमलेल्या नागरिकांनाही याबद्दल माहिती देण्यात आली.
आज १२ वाजून २९ मिनिटांपासून जवळजवळ ५२ सेकंदांपर्यंत सावलीने साथ सोडली होती. खगोलशास्त्रात याला ‘झिरो शॅडो डे’ म्हणजे ‘शून्य सावली दिवस’ म्हणतात. आता हा दिवस पुन्हा तीन महिन्यांनी अनुभवता येणार आहे. म्हणजे ६ ऑगस्ट २०१९ ला १२ वाजून ३९ मिनिटांपासून ५२ सेकंदांपर्यंत सावली आपली साथ सोडेल, अशी माहिती प्रा. डॉ. कारंजकर यांनी दिली.
श्री अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाज्याजवळ असणाऱ्या दिपमाळेशेजारी आज आम्ही या प्रयोगाचे प्रात्यक्षिक केले. रिटाॅर्ड स्टॅंड आणि पाईंटर याची उंची आज आम्ही मोजली. 12 वाजून 29 मिनिटांनी या वस्तूंची सावली शुन्य झालेली आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर 52 सेंकदानंतर सावली पुन्हा दिसण्यास सुरवात झाली.
- प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर
या प्रयोगाबाबत सविस्तर माहिती देताना प्रा. डाॅ. कारंजकर म्हणाले, कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्यांना वर्षातून दोन वेळेला शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त या वृत्तांवर राहणाऱ्या लोकांना वर्षातून फक्त एकदाच शून्य सावलीचा आनंद घेता येतो. मात्र, कर्कवृत्ताच्या वरील भागात, तर मकरवृत्ताच्या खालील भागात राहणाऱ्या लोकांना ‘झीरो शॅडो डे’ म्हणजे शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येत नाही.
आपली पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते, त्याला २३.५ डिग्री एवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या भासमान मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्यांनी वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र व १२ तासांचा दिवस असतो. या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर वरून पडतात. त्यामुळे विषुववृत्तावर कोठेही उभे राहिले, तरी काही काळासाठी आपली सावली नाहीशी होते. त्यानंतर बरोबर तीन महिन्यांनी मकरवृत्तावर, त्याच्या तीन महिन्यांनंतर परत विषुववृत्तावर आणि नंतर परत तीन महिन्यांनंतर कर्कवृत्तावर आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.
कर्कवृत्त व विषुववृत्त या दोन स्थानांमध्ये सूर्याची किरणे ही ज्यावेळी १६.७४ डिग्री नॉर्थ या रेखावृत्तावर पडतील, त्या वेळी त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व जागांवर काही सेकंदांपर्यंत शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. आपले कोल्हापूर हे एक त्या स्थानावर येत असल्याने शहरात ६ मे २०१९ ला दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ५२ सेकंदांपर्यंत आपल्याला शून्य सावलीचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर तीन महिन्यांनंतर म्हणजे ६ ऑगस्ट २०१९ ला दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपासून काही सेकंदांपर्यंत परत शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. ६ मे २०१९ नंतर निरनिराळ्या दिवशी राज्यात निरनिराळ्या ठिकाणी शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.

from News Story Feeds http://bit.ly/2V0nJkg
Comments
Post a Comment