नवी दिल्ली - जगभरात 22 एप्रिल वसुंधरा दिन. यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे. गुगलने एक ऍनिमेटेड डुडल केले आहे.
या डुडलवर क्लिक केले असता एक व्हिडिओ प्ले होतो. यामध्ये पृथ्वी दाखविण्यात आली असून, तिचे सौंदर्य दाखविण्यात आले आहे. या गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे.
डुडलच्या पहिल्या स्लाइटमध्ये वॉन्डरिंग अल्बट्रॉस पक्षी दिसतो पृथ्वीवरील सर्वात मोठ्या पंखांचा हा पक्षी. तो उडताना शेकडो मैलांपर्यंत पंख फडफडवत नाही. दुसऱ्या स्लाइडमध्ये सर्वाधक उंच कोस्टर रेडवुड झाड दिसते. जगातला सर्वात लहान बेडूकही आपल्याला दिसतो. सर्वात मोठी पाणवनस्पती अॅमेझॉन वॉटल लिलीदेखील आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीवर 40 कोटी वर्षांपासून अगदी डायनॉसोर काळापासून ज्याचं अस्तित्व आगे तो सीलकॅंथ पक्षीही या डुडलमध्ये आहे.
जेव्हा वसुंधरा दिन सुरू झाला तेव्हा तो 21 आणि 22 एप्रिल रोजी साजरा केला जात असे. 1970 पासून तो 22 एप्रिलला साजरा होण्यास सुरुवात झाली.

from News Story Feeds http://bit.ly/2Dswm0X
Comments
Post a Comment