आज रात्री पाहा ‘ग्रेट सुपरमून’

या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या लागोपाठच्या महिन्यांतील पौर्णिमांना चंद्र सुपरमून कक्षेतून प्रवास करेल. त्यातही मंगळवार (ता. १९ फेब्रुवारी)च्या पौर्णिमेचा चंद्र हा सर्वांत जवळून प्रवास करेल म्हणून त्या रात्रीचा चंद्र या वर्षातील ग्रेट सुपरमून असेल. त्याचे विलोभनीय दर्शन जरूर घ्या.

या माघ पौर्णिमेचे चंद्रबिंब वाटोळे, अत्यंत तेजस्वी  आणि मोठे असेल. त्याचा आकार नेहमीपेक्षा सुमारे १४ टक्के, तर तेज ३० टक्‍क्‍यांनी वाढलेले दिसेल. या वर्षातील तीन सुपरमून पैकी हे सर्वांत मोठे चंद्रबिंब असेल म्हणून याला ‘ग्रेट सुपरमून’ म्हणायला हरकत नाही.

चंद्र पृथ्वीभोवती ज्या कक्षेतून फिरतो ती कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने पृथ्वी प्रदक्षिणेवेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर नेहमी बदलते. कधी तो पृथ्वीच्या जवळून (perigee) ३,५६,५०० किमी अंतरावरून प्रवास करतो तर कधी दूरवरून(oppogee)  ४,०६,७०० किमी अंतरावरून प्रवास करतो. त्याची सरासरी कक्षा ३,८४, ४०० किमी आहे. रिचर्ड नॉल्ले या खगोल वैज्ञानिकाच्या मते पृथ्वीपासून  ३,६१,७४० किमीपेक्षा जवळून चंद्र जात असेल आणि तो सूर्याच्या विरुद्ध दिशेला असेल (पौर्णिमा) तर त्या रात्रीच्या चंद्राला ‘सुपरमून’ म्हणतात.  

फेब्रुवारी आकाश निरीक्षणासाठी पर्वणीच आहे. सध्या केवळ डोळ्यांनी दिसणारे पाचही ग्रह आकाशात छान दिसत आहेत. सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्‍चिम क्षितिजावर बुध  ग्रह आणि मध्य मंडलाच्या पश्‍चिमेला लाल रंगाचा मंगळ  ग्रह, पहाटे पूर्व दिशेला ठळठळीत तेजस्वी असे शुक्रबिंब आणि त्याच्या थोडे वर दक्षिणेकडे तिरक्‍या दिशेत पाहिल्यास ठळक दिसणारा गुरु ग्रह ओळखता येईल. शुक्राच्या शेजारी पाहिल्यास वरील दोघांच्या तुलनेत मंदप्रभ लहान आकाराचा तांबूस रंगाचा शनि ग्रह चटकन सापडेल. एकदा या सर्व ग्रहांची ओळखी पटल्यानंतर त्यांच्या हालचाली लक्षात येतील आणि तुमचा आकाश दर्शन परिपूर्ण होत जाईल. येत्या २७ फेब्रुवारीला सायंकाळच्या आकाशात बुध ग्रह १८ अंशावर पश्‍चिम  क्षितिजावर दिसेल. तर पहाटे पूर्वेला पहा, क्षितिजावर उतरणारा शुक्र शनिच्या शेजारी अगदी जवळ आला  असून दोघांची युतीचे सुंदर दृश्‍य सध्या दिसतेय.  

News Item ID: 
558-news_story-1550550329
Mobile Device Headline: 
आज रात्री पाहा ‘ग्रेट सुपरमून’
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
today see the grate super moon
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
चंद्र, सुपरमून, कोल्हापूर, सूर्य
Twitter Publish: 

from News Story Feeds http://bit.ly/2IocYqV

Comments

clue frame