पुणे : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती परग्रहवासीयांमुळे झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताची पडताळणी "गगनयान' मोहिमेत करता येईल का, याची चाचपणी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौची यांनी सांगितले.
राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवसातील चर्चासत्रात बहुचर्चित खगोल-जीवशास्त्रीय बलून प्रयोगाची माहिती त्यांनी दिली. सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी धूमकेतूच्या धडकेमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले असावे, या हॉइल-विक्रमसिंग सिद्धांताची पडताळणी बलून प्रयोगाद्वारे 2006 मध्ये घेण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुढील संशोधनाच्या अनुषंगाने गगनयान मोहिमेत याचा समावेश करण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
"स्वयम'या उपग्रहाची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे देशभरातील शास्त्रज्ञांनी या वेळी कौतुक केले. महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ. मनीषा खळदकर यांनी "स्वयम'चा सात वर्षांचा खडतर प्रवास वैज्ञानिकांसमोर उलगडून सांगितला. "स्वयम'च्या यशामुळे प्रेरित झालेले विद्यार्थी सीसॅट-2 या उपग्रहाची निर्मिती सध्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कोणत्याही उपकरणास भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) अवकाशात विनामूल्य सोडेल, अशी माहिती शास्त्रज्ञांनी उपस्थितांना दिली. "अवकाशयानाच्या परतीच्या प्रवासात महत्त्वपूर्ण असणाऱ्या उष्णता प्रतिबंधक प्रणालीच्या विकासामध्ये विद्यापीठातील विविध विभागांचा सहभाग आहे. सध्या इस्रो आणि विद्यापीठ सुमारे दीडशे प्रकल्पांवर संयुक्तरीत्या काम करत असून आम्ही हा सहभाग वाढवत आहोत,'' असेही शास्त्रज्ञ मनीष चंद्रा यांनी सांगितले.
काय आहे खगोल-जीवशास्त्रीय बलून प्रयोग?
- पृथ्वीवर आणि वातावरणामध्ये काही अपरिचित सूक्ष्मजीवांचे अस्तित्व वैज्ञानिकांना आढळून आले. हे जीव परग्रहावरील असू शकतात.
- हॉइल-विक्रमसिंग या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या पॅन्सपरमिया सिद्धांताची पडताळणी जगभरातील संशोधक विविध प्रयोगाद्वारे करत आहेत.
-16 निर्वात कंटेनर वातावरणातील वेगवेगळ्या उंचीवरील हवेचे नमुने अत्यंत काळजीने घेतात.
- हवेच्या नमुन्यांची चाचणी करून त्यात आढळलेल्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास प्रयोगशाळेत केला जातो.

from News Story Feeds http://bit.ly/2HKXtsR
Comments
Post a Comment