इवलीशी फुलपाखरं अंगणात बागडताना पूर्वी दिसायची. फुलांतील मकरंद गोळा करताना त्यांची चाललेली धडपडही साऱ्यांनीच पाहिली असेल. सिमेंटच्या वाढत्या जंगलात त्यांना आकर्षित करणारी फुलझाडेच लुप्त झाली. म्हणून पक्षी-प्राणीमित्रांनी एकत्र येत आमराईत फुलपाखरू उद्यान साकारले आहे.
फुलपाखरांना दोन प्रकारची झाड लागतात.
1) नेक्टर प्लांट (मकरंद वनस्पती) - घाणेरी, स्नेकविड, पेंटास, व्हरबीनो, कॉसमॉस, झिनिया, सदाफुली इ ह्यातून फुलपाखरू रस घेतात त्यामुळे ह्या झाडाभोवती फुलपाखरांचा वावर असतो
२) होस्ट प्लांट( खाद्य वनस्पती ) - लिंबू, कडीपत्ता, कृष्णकमल, सोनचाफा, अशोक, रुई, एरंड, आंबा, पानफुटी, बदकवेल इ.ह्या झाडावर यावर फुलपाखरू अंडी घालतात आणि त्यातून बाहेर येणारी अळी त्याच वनस्पतीची पान खाऊन मोठी होते, कालांतराने त्या अळीचा कोष होतो आणि त्यातून एक सुंदर फुलपाखरू जन्माला येते.
फुलपाखरू अन्नसाखळी मधील महत्त्वाचा घटक आहे. यावर मुंग्या, सरडा, पाल, पक्षी, कोळी इत्यादी जीव अवलंबून आहेत. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे, रासायनिक खतांच्या अती वापरामुळे फुलपाखरांच्या संख्येत घट झालेली आहे
फुलपाखरुचे नाव - टाऊनी कॉस्टर
खाद्य वनस्पती - कृष्ण कमळ
फुलपाखरुचे नाव - पायोनियर
खाद्य वनस्पती ( होस्ट प्लांट )- वाघाटी
प्रत्येक फुलपाखरुचे होस्ट प्लांट वेगळे असते. आपले झाड ओळखून फुलपाखरू त्यावर अंडी घालतात. अंड्यातून अळी बाहेर यायला दोन ते तीन दिवस लागतात. त्या अळीचा कोष होण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात आणि कोषातून फुलपाखरू बाहेर येण्यासाठी 10 ते 12 दिवस लागतात (प्रत्येक फुलपाखराचं वेगळा कालावधी असतो)
आपल्या भागात आढळणारी फुलपाखरे -
ब्लू मॉर्मन ( महाराष्ट्र राज्य फुलपाखरू ), सदर्न बर्डविंग (कर्नाटक राज्य फुलपाखरू), रेड हेलन, प्लेन टायगर , कॉमन क्रो, कॉमन रोझ, टेल्ड जे, कॉमन जे , ब्लू प्यांसी , लेमन प्यांसी, ब्लू टायगर, झेब्रा ब्लू, कॉमन मॉर्मन, कॉमन लेपर्ड, ग्रेट एग फ्लाय, चॉकलेट प्यांसी अशा जवळजवळ 85 प्रकारचे फुलपाखरू आपल्या भागात आढळतात
अंगणात फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी कोणती झाडे लावली पाहिजेत, यासाठीच्या या टिप्स्.
- फुलपाखरू हा आकर्षक रंगाचे पंख असलेला किटक प्रकार आहे. अंडी, अळी, कोश व कीटक या त्याच्या चार अवस्था.
- सांगलीत प्रमुख्याने महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉनसह (राणी पाकोळी) ८० जाती आढळतात.
- फुलपाखरांना मकरंद गोळा करण्यासाठी नेक्टर प्लॅंट तर अंडी घालण्यासाठी होस्ट प्लॅंट लागतात.
- अंगणात शोपेक्षा लिंबू, कडीपत्ता, आंबा, सोनचाफा अशी देशी झाडे, फुलझाडे लावल्यास फुलपाखरे आकर्षित होतील. जास्वंद, घाणेरी, पेंटास, कॉसमॉस, खुपीया, एक्झोरा ही झाडेही त्यात विशेषत्वाने असावीत.
- रोपट्यांसाठी रासायनिक औषधांचा अजिबात वापर करू नये.
- अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर ट्रेरेस गार्डन करा. देशी झाडेच लावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- फुलपाखराच्या शरीराचे तापमान ८६ डिग्रीपेक्षा कमी असल्यास, त्यांना हवेत झेपावता येत नाही. त्यामुळे काही झाडे उंचीने वाढतात, त्याची छाटणीही वेळच्यावेळी करा. जेणेकरून फुलपाखरांना सोयीचे होईल.
- शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या खुल्या जागेतही फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी झाडे लावावीत.
( लेखक ॲनिमल सहारा फौंडेशनचे सदस्य आहेत)

from News Story Feeds http://bit.ly/2RelJaQ
Comments
Post a Comment