Google Ai News : AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने मागील काही महिन्यात एकापेक्षा एक भारी शोध लावून जगाला आश्चर्यचकीत केलं आहे. त्यात आतागुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक खास माहिती दिली आहे. त्यांच्या मते Google AI अशा काही अल्गोरिदमवर काम करत आहे जे आगामी काळात आरोग्य तंत्रज्ञानामध्ये अगदी अद्भुत बदल करणार आहे. थोडक्यात सांगायचं तर शरीरात होणारे कोणतेही आजार फक्त डोळ्यांचं स्कॅनिंग करूनच ओळखता येऊ शकणार आहे. पिचाई यांनी नुकतीच ही मोठी घोषणा केली आहे. तर गुगल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून डोळे स्कॅन करून आजार शोधणार असल्याने जुन्या मेडिकल पद्धतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता एआयच्या मदतीने सीटी स्कॅन, एमआरआय आणि एक्स-रे ऐवजी डोळ्यांचे स्कॅनिंग करून डॉक्टरांना आजार ओळखता येणार आहेत. Google आणि अरविंद आय हॉस्पिटलच्या टीमने मिळून एक स्वयंचलित टूल तयार केल्यावर आरोग्य तंत्रज्ञानातील Google चे AI सुरू झाले. डायबेटिक रेटिनोपॅथी शोधण्यासाठी या उपकरणावर काम केले जात होते. त्यांनी एक अल्गोरिदम वापरला जो रेटिनल फोटोंवरून म्हणजेच डोळ्यांच्या पडद्याच्या मदतीने काही सेकंदात रुग्णाला कोणता आजार आहे की नाही हे सांगू शकतो. चलातर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ...
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/B3DF2d4
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/B3DF2d4
Comments
Post a Comment