AI Based Animal Photos : मागील काही महिन्यांपासून सर्वत्र फक्त AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची चर्चा होताना दिसत आहे. AI हेच फ्युचर असणार असं म्हटलं जात असून आजकाल अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. दरम्यान याच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं काही असे फोटो क्रिएटर्सनी तयार केले आहेत. ज्यात प्राणी माणसं असते तर कसे दिसले असते ते दाखवलं आहे. याआधी AI च्या मदतीनं एका ५ वर्षाच्या मुलीचं अगदी ९९ वर्षापर्यंतचं रुप कसं दिसेल, तसंच विराट कोहली क्रिकेटर नसून इतर कोणत्यातरी क्षेत्रात असता तर कसा दिसला असता? असे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता हे प्राणी माणसांप्रमाणे असते तर कसे दिसले असते हे फोटोही व्हायरल होत आहेत. यात बऱ्याच प्राण्यांचं ज्यामध्ये जलचर, किटकही आहेत ते माणसांप्रमाणे कसे दिसले असते ते दाखवलं गेलं आहे.
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/VQ8M9Oz
from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/VQ8M9Oz
Comments
Post a Comment