Twitter News: ट्विटरला का आणावं लागलं ब्लू टिक सब्सक्रिप्शन? 'हे' आहे त्यामागचं खरं कारण

Twitter Blue Subscription : ट्विटरच्या नव्या नियमांमुळे आता ब्लू टिकसाठी पैसे देऊन ट्विटरचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे कितीतरी महत्त्वाच्या व्यक्तींच्या ट्विटरवरुन ब्लू टिक गायब झाली आहे. भारतातही सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार अशा कितीतरी सेलिब्रिटींची ब्लू टिक आज गायब झाली आहे. या सर्वांना ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. दरम्यान ट्विटरने इतकं मोठं पाऊल उचलण्यामागे एक मोठं कारणंही आहे. ट्विटरचे नवीन मालक एलन मस्क यांनी काही काळापूर्वीच ट्विटर ४४ बिलियन डॉलर (सुमारे ३,३६,९१० कोटी रुपये) खर्च करून विकत घेतलं होतं. दरम्यान त्यानंतर कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने ही सब्सक्रिप्शन सेवा मस्क यांनी आणली आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/n6rTb5A

Comments

clue frame