​Cyber Fraud: फेक ऑफरपासून ते सेक्सटॉर्शनपर्यंत सायबर फ्रॉडसाठी स्कॅमर्सचे पाच फंडे

नवी दिल्ली : Cyber Crime Frauds : आजकाल सर्व काही डिजीटल होत आहे. म्हणजे कोणत्याही छोट्या दुकानातील युपीआय पेमेंटपासून ते मोठमोठे बॅकिंग ट्रान्सफर देखील आजकाल डिजीटल झाले आहेत. वर्क फ्रॉम होममुळे तर आता ऑफिसही ऑनलाईनही झाल्यामुळे एकंदरीत काय तर सर्व आयुष्य डिजीटल झालं आहे. त्यामुळे आपले सर्वच डिटेल्स आजकाल इंटरनेटवर असतात. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. सर्वत्र ऑनलाईन घोटाळे होताना दिसून येतात. ईमेल कधी फोन, तर कधी सोशल मीडिया अकाऊंट यावरुनही स्कॅमर्स गंडा घालतात. सेक्सटॉर्शन, हनी ट्रॅप यादेखील काही अशा पद्धती आहेत, ज्यामुळे व्यक्तीचं आर्थिक तसंच मानसिक नुकसानही होतं.अलीकडेच एका ६५ वर्षीय व्यक्तीची अशाचप्रकारे फसवणूक झाली. त्यांनी एका मॅरेज पोर्टलवर पुन्हा लग्न करण्यासाठी नोंदणी केली होती. ज्यानंतर पोर्टलवर एका महिलेशी बोलण्यासही सुरुवात केली. दोघांनीही नंबरची देवाणघेवाण केली. ज्यानंतर व्हिडिओ कॉलही झाला. वृद्धाने पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे त्या महिलेने व्हिडीओ कॉलवर तिचे कपडे काढण्यास सुरुवात केली आणि व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्तीलाही कॅप्चर केलं. ज्यानंतर त्या वृद्धाला अब्रूनुकसानीच्या भीतीने ब्कॅकमेल करत तब्बल 60 लाख रुपयांना लुटलं. अशाच अनेकप्रकारे स्कॅमर्स ऑनलाईन फ्रॉड करतात, त्यातीलच काही प्रकारांबद्दल जाणून घेऊ...

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/y7Q38xk

Comments

clue frame