6G साठी PM मोदींचं 'मिशन' ठरलं; जपान, कोरिया आणि अमेरिकेच्या रांगेत भारत

6G Network: भारतात अजून सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या संपूर्ण ग्राहकांना 5G नेटवर्कची सुविधा देणे बाकी आहे. देशात सध्या फक्त दोन टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या ग्राहकांना ​5G नेटवर्कची सुविधा देत आहे. ही सुविधा सुद्धा देशातील काही प्रमुख शहरात मिळत आहे. संपूर्ण भारतात ५जी सर्विस मिळायला अजून वेळ आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलची तर अजून ४ जी सेवा मिळत नाही. देशात ५जी नेटवर्कची चर्चा सुरू असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G नेटवर्क साठी प्रयत्न सुरू केले आहेत. पीएम मोदी यांनी ६ जी नेटवर्क सुविधा सुरू करण्यासाठाी एक टास्क फोर्स बनवले आहे. हे लागोपाठ यावर काम करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत भारतात 6G नेटवर्क सुरू केले जावू शकते.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/T13Gs9F

Comments

clue frame