भारतात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन कंपन्यांनी आपली ५जी सर्विस लाँच केली आहे. भारतातील अनेक प्रमुख शहरात आता ५जी सर्विस मिळत आहे. त्यामुळे अनेक जण ५ जी स्मार्टफोन खरेदी करीत आहेत. ५जी इंटरनेट मार्केटमध्ये आल्याने ५जी स्मार्टफोनचे मार्केट बऱ्यापैकी वाढले आहे. आता देशातील अनेक स्मार्टफोन कंपन्या बजेट मध्ये ५जी स्मार्टफोन लाँच करीत आहेत. तुम्हाला जर वेगवान इंटरनेट स्पीड आणि ५जी सपोर्टचा डिव्हाइस खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी काही खास बजेटमधील स्मार्टफोनची माहिती देत आहोत. जर तुमचे बजेट कमी असेल तसेच तुम्ही ५जी स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करू शकत नसाल तर मार्च २०२३ मध्ये बेस्ट ५जी स्मार्टफोनची माहिती दिली आहे. हे बजेट फोन फास्ट इंटरनेट टेक्नोलॉजी सोबत येतात. या लिस्टमध्ये Xiaomi Redmi Note 11T 5G, POCO M4 Pro 5G, Samsung Galaxy F23 5G, Motorola Moto G71 5G आणि Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनचा समावेश आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bP54QDY
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bP54QDY
Comments
Post a Comment