नव्या वर्षात नवीन फ्लॅगशीप फोन लाँच, पाहा कोणता स्मार्टफोन सर्वात जास्त पॉवरफुल

२०२३ वर्षाच्या सुरुवातीला अनेक फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. या यादीत सॅमसंग गॅलेक्सी S23 सीरीज आणि iQoo 11 सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. फेब्रुवारी मध्ये वनप्लसने आपला पॉवरफुल स्मार्टफोन oneplus 11 5G भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिले आहे. आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन संबंधी सविस्तर जाणून घ्या. Oneplus 11 5Gवनप्लसने आपला लेटेस्ट फोन याच महिन्यात भारतात लाँच केला आहे. Oneplus 11 5G कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या फोनला सर्वात फास्ट अँड्रॉयड प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 दिले आहे. फोन सोबत १६ जीबी पर्यंत रॅम सपोर्ट दिले आहे. फोन सध्या १२० वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा 2K रिझॉल्यूशनचा डिस्प्ले दिला आहे. फोनला अँड्रॉयड १३ सोबत OxygenOS 13 सोबत आणले आहे. फोनमध्ये थर्ड जनरेशन Hasselblad कॅमेरा सपोर्ट सोबत ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा सोनी IMx890 सोबत येतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ५६ हजार ९९९ रुपये आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iOqQAms

Comments

clue frame