Tech Evets 2023: कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 ची गेल्या आठवड्यात तंत्रज्ञान जगतात बरीच चर्चा झाली. ५ ते ८ जानेवारी दरम्यान हा मेगा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये अनेक स्मार्ट आणि नाविन्यपूर्ण उत्पादने सादर केली गेली. अमेरिकेतील लास वेगास येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तंत्रज्ञान जगतातील मोठ्या कंपन्यांनी या कार्यक्रमात त्यांच्या सर्जनशील आणि नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज उत्पादनांचे प्रदर्शन केले. तर, केंद्रीय मंत्र्यांच्या फटकाऱ्यानंतर व्हॉट्सअॅपला माफी मागावी लागली. Tecno ने भारतात आपला सर्वात महागडा फोन लाँच केला. त्याच वेळी Redmi ने Note 12 सीरीज भारतात लाँच केली. तुम्हाला गेल्या आठवड्यातील असे तंत्रज्ञान अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर, ही माहिती तुमच्यासाठीच. आज आम्ही तुम्हाला प्रमुख टेक अपडेट्स तसेच आठवड्यातील प्रमुख गॅजेट्सची माहिती देणार आहो.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zCl4i8m
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zCl4i8m
Comments
Post a Comment