देश विदेशातील टेक्नोलॉजी ही आता कुठ पर्यंत पोहोचली आहे. याचा अंदाज बांधणे फारच कठीण झाले आहे. जगभरातील टेक्नोलॉजी पाहून अनेकांना तोंडात बोटे घातली आहेत. जगात चॅट जीपीटीची चर्चा सुरू असतानाच आता अमेरिकेतील कोर्टात थेट रोबोट बाजू मांडणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी म्हटले की जग आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या सुवर्ण युगात प्रवेश करीत आहे. यानंतर एक खरेखुरे रुप समोर आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी आता वेगाने डेव्हलप होत आहे. यात नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. या यादीत आता अमेरिकेने जगातील पहिला AI टेक्नोलॉजीवर आधारित रोबोट वकील (AI Robot Lawyer) बनवला आहे. हा रोबोट सध्या ओव्हर स्पीडिंग संबंधी कायदेशील सल्ला देणार आहे. याआधी AI टेक्नोलॉजी आधारित ChatGPT ची खूपच चर्चा झाली होती.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UotbM84
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/UotbM84
Comments
Post a Comment