5G चे शतक ! या १०१ शहरात पोहोचली 5G सेवा, Airtel-Jio ग्राहक पाहा ही लिस्ट

5G India: रिलायन्स जिओने अलीकडेच तामिळनाडूच्या सहा प्रमुख शहरांमध्ये 5G लाँचची घोषणा केली आहे. टेल्कोने म्हटले आहे की, त्यांची 5G Welcome Offer तामिळनाडूमधील मदुराई, कोईम्बतूर, तिरुचिरापल्ली, होसुर, सेलम आणि वेल्लोरमधील ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. जिओने सांगितले की, या लाँचमुळे एकूण 5G शहरांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. जिओने डेहराडून (उत्तराखंड) मध्येही 5G सेवेची घोषणा केली आहे. या लाँचसह जिओ डेहराडूनमधील ग्राहकांना 5G सेवा देणारा पहिला आणि सध्या एकमेव ऑपरेटर बनला आहे. जिओने उत्तराखंडमध्ये 5G SA सुरू करण्यासाठी ६५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असल्याचे सांगितले. राज्यात नेटवर्क सेवा सुरू करण्यासाठी टेल्कोने यापूर्वीच ४९५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ११ जानेवारी २०२३ पासून, डेहराडूनमधील Jio युजर्सना वेलकम ऑफर अंतर्गत 1 Gbps+ स्पीडसह अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी इन्व्हाईट केले जाईल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SaG7eBw

Comments

clue frame