5G Smartphones in india: 2022 या वर्षात भारतात ५जी नेटवर्क लाँच करण्यात आले आहे. आता देशात लागोपाठ जास्तीत जास्त शहरात 5G Services (5जी सर्विसेज) रोल आउट केली जात आहे. देशात ऑक्टोबर २०२२ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G Network चे उद्धाटन करण्यात आले. याचे उद्धाटन होताच यावरून पडदा हटवला गेला. देशातील अनेक शहरात आता Airtel 5G आणि Jio 5G सर्विस उपलब्ध केली जात आहे. तुम्ही सुद्धा 5G Smartphones सोबत 5G Services चा एक्सपीरियन्स घेणार असाल तर भारतात कोणकोणत्या कंपन्यांनी आपले ५जी स्मार्टफोन लाँच केले आहेत. याची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या लागोपाठ आपल्या स्मार्टफोनमध्ये 5G-रेडी सॉफ्टवेयर अपडेट जारी करीत आहे. या सर्व फोन्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IyQ28iN
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IyQ28iN
Comments
Post a Comment