Amazon वर स्मार्टफोन Upgrade Days सेल लाईव्ह, ब्रँडेड फोन्सवर ४० टक्क्यांपर्यंत ऑफ, तुम्ही कोणता खरेदी करणार ?
Smartphone Offers On Amazon Sale : पॉप्युलर स्मार्टफोन्स नेहमीपेक्षा स्वस्तात खरेदी करण्याची एक जबरदस्त संधी आता युजर्सकडे आहे. याचे कारण म्हणजे लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल सुरू झाला आहे. १२ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सेल १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून यादरम्यान स्मार्टफोनवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ग्राहक OnePlus, Xiaomi, Samsung, iQOO, Oppo आणि Realme सारख्या ब्रँड्सचे भन्नाट स्मार्टफोन्स मोठ्या सवलतीत या सेलमधून खरेदी करू शकतात. स्मार्टफोनवर ४० टक्क्यांपर्यंत सूट व्यतिरिक्त, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना अनेक बँक ऑफरचा लाभ देखील देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, फोन खरेदी करताना बँक ऑफ बडोदा किंवा नॉर्थ फेडरल बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरावे लागेल आणि फोनच्या किमतीवर अतिरिक्त १० टक्के सूट दिली जाईल. पाहा ऑफर्स .
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zIdWO9B
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zIdWO9B
Comments
Post a Comment