108MP कॅमेरा, 6000mAh ची बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा, किंमत २० हजारांपेक्षा कमी, पाहा फोन्सची लिस्ट

108mp camera phone under 20000 : स्मार्टफोन कंपन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. कंपन्या प्रत्येक सेगमेंट मध्ये आपल्या स्मार्टफोनला अपग्रेड करीत आहे. स्मार्टफोन कंपन्या मिड रेंज स्मार्टफोन वर खूप मेहनत करीत आहेत. कंपन्या मिड रेंज सेगमेंट मध्ये ग्राहकांसाठी व्हॅल्यू फॉर मनी डिव्हाइस लाँच करीत आहे. जे अडवॉन्स्ड फीचर आणि अनेक सर्व अपग्रेड्स सोबत लाँच केले जातात. आधी मिड रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सल आणि ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत होता. परंतु, आता १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जात आहे. मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या १०८ मेगापिक्सल कॅमेराची लिस्ट या ठिकाणी दिली आहे. या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंत चांगला कॅमेराचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर इंडियन मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या १०८ मेगापिक्सल कॅमेरा संबंधी सर्व म्हणजे फोनची किंमत, फीचर्स संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6EfXjLA

Comments

clue frame