नवी दिल्ली: टेक कंपनी ला प्रामुख्याने बजेट स्मार्टफोन्ससाठी ओळखले जाते. मात्र, कंपनी आपल्या स्थानिक बाजारात नवनवीन कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सला लाँच करत असते. शाओमीने स्मार्टफोन्स व्यतिरिक्त स्मार्ट टीव्हीसह अनेक घरात उपयोगी येणारे प्रोडक्ट्स सादर केले आहेत. आता कंपनीने आपल्या लाइनअपचा विस्तार करत चीनच्या बाजारात लेटेस्ट वॉशिंग मशीनला सादर केले आहे. विशेष म्हणजेच या वॉशिंग मशीनची किंमत खूपच कमी आहे. ने MIJIA Pulsator ला लाँच केले आहे. कंपनीने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात चे एक्सक्लूसिव्ह एडिशन देखील लाँच केले आहे. वाचा: MIJIA Pulsator Washing Machine चे फीचर्स Xiaomi ने आपल्या स्मार्ट होम अॅप्लायन्सचे नवीन व्हर्जन सादर केले आहे. गेल्यावर्षी कंपनीने १० किलो क्षमतेसह येणाऱ्या वॉशिंग मशीनला लाँच केले होते. परंतु, यावेळेस ८ किलो क्षमतेसह येणाऱ्या प्रोडक्टला कंपनीने सादर केले आहे. या Washing Machine मध्ये कंपनीने स्मार्ट वेट परसेप्शन, १० वेगवेगळे वॉशिंग आणि ८ लेव्हल वॉटर लेव्हल एडजस्टमेंटचे फीचर दिले आहे. Xiaomi MIJIA Pulsator Washing Machine मध्ये चार ब्लेडची Pulsating मोटर मिळते. याद्वारे कपड्यांवरील डाग सहज निघून जातात. यात कपड्यांनुसार वॉशिंग केअरची सुविधा मिळते. जेणेकरून, कपडे खराब होत नाहीत. मशीन आपोआप कपड्यांच्या वजनानुसार पाण्याची पातळी देखील एडजस्ट करते. MIJIA Pulsator Washing Machine ची किंमत MIJIA Pulsator Washing Machine मध्ये सुरक्षेसाठी चाइल्ड लॉक दिला आहे. यामुळे मुलं याचा चुकीचा वापर करू शकणार नाहीत. सध्या या प्रोडक्टला केवळ चीनमध्ये लाँच केले आहे. कंपनीने चीनमध्ये वॉशिंग मशीनला फक्त ७९९ युआन (जवळपास ९,६५० रुपये) किंमतीत सादर केले आहे. सोबतच, वॉशिंग मशीनला तुम्ही Mi Home App शी कनेक्ट करू शकता. म्हणजेच, या वॉशिंग मशीनला थेट स्मार्टफोनने कंट्रोल करणे शक्य आहे. तसेच, वॉइस प्रॉम्प्टद्वारे देखील याचा वापर करता येईल. अॅपच्या मदतीने वॉशिंग टाइम आणि मोड्स सिलेक्ट करता येतात. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cNZnHpM
Comments
Post a Comment