Tata Play ग्राहकांना चक्क मोफत देत आहे १,१५० रुपयांचा हाय-स्पीड इंटरनेट प्लान, जाणून घ्या कसा घेता येईल फायदा?

नवी दिल्ली : टाटा स्काय ब्रॉडबँडने काही दिवसांपूर्वीच आपले नाव बदलून असे केले आहे. आता कंपनी आपल्या यूजर्सला एक मोफत प्लान ऑफर करत आहे. तुम्हाला Fiber चा १,१५० रुपयांचा प्लान एक महिन्यासाठी मोफत मिळू शकतो. यूजर्स कंपनीच्या नवीन 'Try and Buy' स्कीम अंतर्गत मोफत प्लानचा फायदा घेऊ शकतात. यूजर्सला कनेक्शन खरेदी करण्याआधी सर्विस क्वालिटी टेस्टिंगसाठी हा प्लान दिला जातो. Tata Play Fiber ची 'Try and Buy' स्कीम सध्या काही ठराविक शहरांमध्येच उपलब्ध आहे. यामध्ये नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, ग्रेटर नोएडा, व इतर काही शहरांचा समावेश आहे. वाचा: परंतु, या ऑफरचा फायदा घेताना काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा १ हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. फायबर प्लानची किंमत १,१५० रुपये आहे. या प्लानमध्ये २०० एमबीपीएस डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शनची सुविधा मिळते. नवीन ग्राहकांना मोफत या ऑफरचा लाभ मिळेल. तुम्ही जर टाटा प्ले चे सदस्य नसल्यास, या ऑफरचा मोफत लाभ घेऊ शकता. परंतु, यासाठी तुम्हाला १,५०० रुपये सुरक्षित डिपॉजिट द्यावे लागेल. तसेच, टाटा प्ले फायबरचा २०० एमबीपीएससह येणारा प्लान घ्यायचा असल्यास १,१५० रुपये द्यावे लागतील. ट्रायल प्लान अंतर्गत यूजर्सला १ हजार जीबी हाय-स्पीड डेटा वापरता येईल. लक्षात घ्या की, टाटा प्ले कडून रिफंड घेण्यासाठी तुम्हाला ३० दिवसांच्या आत कनेक्शन बंद करावे लागेल. या कालावधीमध्ये टाटा प्ले फायबर ग्राहकांना मोफत लँडलाइन कनेक्शन देखील देईल. तुम्ही जर ३० दिवसांच्या आत कनेक्शन रद्द केल्यास तुम्हाला रिफंड परत मिळेल. परंतु, ३० दिवसांच्या सर्विसनंतर कनेक्शन बंद केल्यास तुमच्याकडून ५०० रुपये घेतले जातील. ही रक्कम तुम्ही दिलेल्या १,५०० रुपये सिक्योरिटी डिपॉजिटमधून कापली जाईल. तुम्हाला जर कंपनीची सर्विस आवडल्यास तुम्ही प्लानला पुढे देखील सुरू ठेवू शकता. कंपनीकडे वेगवेगळ्या वैधता आणि किंमतीसह येणारे अनेक प्लान्स आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EVsR2Py

Comments

clue frame