नवी दिल्ली : टाटा स्कायने काही दिवसांपूर्वीच आपल्या नावात बदल करत असे नाव केले आहे. आता कंपनीने ग्राहकांना मोठे सरप्राइज दिले आहे. कंपनीने आपल्या पॅकच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. Tata Play ने आपल्या रिचार्ज पॅकला ग्राहकांसाठी अधिक स्वस्त केले आहे. कंपनीच्या रिचार्ज पॅकसाठी आधी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत असे. परंतु, आता कंपनीने मोठी कपात केल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कंपनीने आपल्या प्लान्समध्ये जवळपास १०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: ३० ते १०० रुपयांची होईल बचत ने आपल्या मासिक चॅनेल पॅकच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने मासिक पॅकच्या किंमतीत ३० ते १०० रुपयांपर्यंत कपात केली असून, कंपनीनुसार यूजर्ससाठी रिचार्ज पॅकच्या किंमतीतील बदल यूजेस हिस्ट्रीच्या आधारावर केला जाईल. यूजर्सच्या पॅकमधून त्या चॅनेलला हटवले जाईल, ज्याचा यूजर्स कमी वापर करतात. अशाप्रकारे यूजर्सच्या मंथली रिचार्जला कमी केले जाईल. म्हणजेच, कंपनी यूजर्सकडून केवळ त्याच चॅनेलचे पैसे घेईल, ज्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. सध्या यूजर्स स्वतः पॅकच्या चॅनेलला हटवू शकत नाही. दरम्यान, Tata Play चा भारतात मोठा यूजर बेस आहे. सध्या टाटा प्ले चे जवळपास १९ मिलियन म्हणजेच १.९ कोटींपेक्षा अधिक अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. इतर सर्विस प्रोव्हाइडर एव्हरेज रेवेन्यू पर यूजर्समध्ये (ARPU) वाढ करत असतानाच टाटा प्ले ने रिचार्ज पॅकच्या किंमतीत कपात केली आहे. टाटा प्ले ने काही दिवसांपूर्वी आपल्या सर्विसमध्ये ओवर द टॉप () कंटेंटचा समावेश केला आहे. कंपनी आपल्या चॅनेल बुके आणि पॅकच्या किंमतीत कपात करत आहे. ज्यामुळे यूजर्सला ओटीटी कंटेंटचा आनंद घेता येईल. मात्र, या कपातीमुळे ग्राहकांचा फायदा होईल. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6I50APF
Comments
Post a Comment