Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनने भारतीयांना लावले वेड, तब्बल १५०० कोटींच्या हँडसेट्सची विक्री; मोडले सर्व रेकॉर्ड

नवी दिल्ली : निर्माता कंपनी ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या एस२२ सीरिजला लाँच केले होते. लाँचनंतर अवघ्या १२ तासातच भारतात ७० हजारांपेक्षा जास्त प्री-बुकिंग झाले होते. रिपोर्टनुसार, लाँचनंतर आतापर्यंत सीरिजच्या १,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या फोन्सची कंपनीने विक्री केली आहे. गॅलेक्सी एस२२ सीरिजच्या फोन्सची सुरुवाती किंमत ७१,००० रुपये, तर टॉप व्हेरिएंटची किंमत जवळपास १,१०,००० रुपयांपर्यंत आहे. तसेच, गॅलेक्सी एस२२ अल्ट्रा अनबॉक्सिंग इव्हेंटने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला आहे. वाचा: शानदार फीचर्ससह येणाऱ्या या Samsung Galaxy S22 सीरिजला भारतीयांची जबरदस्त पसंती मिळत आहे. Samsung ने जवळपास १५ दिवसांपूर्वीच गॅलेक्सी एस२२ सीरिजच्या फ्लॅगशिप हँडसेट्सला लाँच केले आहे. तसेच, गेल्या काही दिवसात सॅमसंगला Apple सारख्या ब्रँड्सकडून प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये जबरदस्त टक्कर मिळत आहे. परंतु, सॅमसंगच्या या लेटेस्ट स्मार्टफोन सीरिजला ग्राहक पसंती देत आहे. सध्या कंपनी गॅलेक्सी एस आणि फोल्ड सीरिजच्या स्मार्टफोनवर लक्ष केंद्रीत करत आहे. भारतातील फोनच्या एकूण सेलमध्ये याचा २० टक्के वाटा आहे. Samsung Galaxy S22 ची भारतातील किंमत Samsung Galaxy S22 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपये आणि ८ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंतम ७६,९९९ रुपये आहे. तर गॅलेक्सी एस२२+ स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८४,९९९ रुपये आहे. फोनच्या ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटसाठी ८८,९९९ रुपये खर्च करावे लागतील. Samsung Galaxy S22 अल्ट्राचे १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १,०९,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. फोनचे टॉप-ऑफ-द-लाइन १२ जीबी + ५१२ जीबी मॉडेल १,१८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. Samsung Galaxy S22 सीरिजचे स्‍पेसिफ‍िकेशन्स Samsung Galaxy S22 स्‍मार्टफोन अँड्राइड १२ वर आधारित वन UI ४.१ वर काम करतो. फोन गोरिल्ला ग्लास विक्ट्स + पॅनेलने प्रोटेक्टेड आहे. यामध्ये ४nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८ Gen १ SoC चा सपोर्ट दिला आहे. Galaxy S22 Ultra मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड शूटरसह १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर मिळतो. तसेच, ३ एक्स ऑप्टिकल झूमसह १० मेगापिक्सलचा टेलिफोटो शूटर आणि १० एक्स ऑप्टिकल झूम सपोर्टसह १० मेगापिक्सलचा टेलिफोटो शूटर कॅमेरा उपलब्ध आहे. सॅमंसगच्या या फोनमध्ये ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1y2OBIv

Comments

clue frame