फक्त ६ हजार रुपयात घरी घेवून जा Samsung चा ‘हा’ शानदार स्मार्ट टीव्ही, मिळतील जबरदस्त फीचर्स; पाहा ऑफर्स
नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म वर ७ मार्चपासून TV Upgrade Days सुरू आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. या सेलमध्ये सॅमसंगच्या टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. सेलमध्ये सॅमसंगचा ३२ इंच स्मार्ट टीव्ही बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्ससह उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही सॅमसंगच्या २०,९०० रुपये किंमतीच्या स्मार्ट टीव्हीला फक्त ५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: 80 cm (32 inch) HD Ready LED वर आकर्षक ऑफर्स फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये Samsung 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV वर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत २०,९०० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ११ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १८,४९९ रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही जर स्मार्ट टीव्ही खरेदी करताना फेडरल बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के म्हणजेच १,५०० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे, सॅमसंगच्या या टीव्हीची किंमत कमी होवून १६,९९९ रुपयांवर येईल. या टीव्हीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. जुना स्मार्ट टीव्ही देवून Samsung चा हा स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास ११ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच, एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास या स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त ५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Samsung 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV चे फीचर्स Samsung 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV हा टायझन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये ३२ इंच एचडी रेडी एलईडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १,३६६x७६८ पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि साउंड आउटपूट २० वॉट आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि युट्यूब सारख्या अॅप्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त या टीव्हीमध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतात. तुम्ही जर कमी किंमतीत ब्रँडेड स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर Samsung चा हा टीव्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vMlA0Iw
Comments
Post a Comment