Samsung Galaxy F23 चे लॉंचिंग आज, फोनची किंमत असेल कमी, पण, चार्जर बॉक्समध्ये येऊ शकते 'हे' ट्विस्ट

नवी दिल्ली: दक्षिण कोरियाची कंपनी Samsung आज, ८ मार्च रोजी भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार असून दुपारी १२ वाजता हा लाँच इव्हेंट होणार आहे. कंपनी एक नवीन मिड-रेंज फोन सादर करणार असून यामध्ये ५००० mAh बॅटरी, ५० MP प्रायमरी कॅमेरा आणि ६.४ इंच डिस्प्ले सारखी वैशिष्ट्ये युजर्सना ऑफर करेल. पण, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळणार नसल्याचेही समोर आले आहे. Samsung Galaxy F23 ची अपेक्षित किंमत: या फोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर केली जाईल. स्मार्टफोन ६ GB RAM + १२८ GB स्टोरेज या एकाच प्रकारात येऊ शकतो. वाचा: याचे स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डद्वारे १ TB पर्यंत वाढवता येते. फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये आणला जाईल - एक्वा ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन. रिपोर्ट्सनुसार, फोनची किंमत जवळपास २४ हजार रुपये असू शकते. Samsung Galaxy F23 चे संभाव्य तपशील: Samsung Galaxy F23 मध्ये ६.४ -इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल. जो फुलएचडी (१९२०x १०८० पिक्सेल) रिझोल्यूशन आणि १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास ५ देण्यात येऊ शकतो. Qualcomm Snapdragon 750 प्रोसेसर देखील फोनमध्ये मिळू शकतो. सोबतच ,Samsung Galaxy F23 मध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज दिले जाऊ शकते. डिव्हाइसमध्ये तळाशी ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देखील अपेक्षित आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. Samsung Galaxy F23 मध्ये ५० MP प्रायमरी सेन्सर, २ MP टेलिफोटो लेन्स आणि ८ MP अल्ट्रा-वाइड १२३ -डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यूसह असेल. समोर, HD व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ MP कॅमेरा उपलब्ध असेल. तसेच, Samsung Galaxy F23 ला आधी पॉवरफुल बनविण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी, २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. पण, चार्जर आणि USB Type-C केबल बॉक्समध्ये येणार नाही असेही सांगण्यात येत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZQYFwTV

Comments

clue frame