नवी दिल्ली: लोकप्रिय कंपनी Realme आज, १० मार्च रोजी दोन नवीन 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. ब्रँडने अलीकडेच Realme 9 Pro सीरिज मधील दोन डिव्हाइस 9 Pro आणि 9 Pro Plus लाँच केले आहेत. आता कंपनी दोन नवीन डिव्हाइसेस आणि SE लाँच करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही स्मार्टफोन 5G सपोर्टसह येतील. कंपनी एका डिव्हाइसमध्ये MediaTek आणि दुस-या डिव्हाइसमध्ये Qualcomm चा प्रोसेसर देईल. याशिवाय, हाय रिफ्रेश रेट, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि इतर अनेक फीचर्स डिव्हाइसमध्ये उपलब्ध असतील. तसेच, या दोन स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कंपनी 5G सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करेल. कंपनीने गेल्या काही दिवसांत अनेक मिड-रेंज आणि बजेट 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. प्रो सीरिजनंतर, यावेळी कंपनी Realme 9 सीरिजमध्ये 5G डिव्हाइस आणत आहे. या डिव्हाइसची किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या. वाचा: Realme 9 5G आणि Realme 9 5G SE ची भारतातील किंमत (अपेक्षित): रिपोर्ट्सनुसार, कंपनी हे दोन्ही डिवाइस २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करू शकते. Realme 9 5G ची किंमत १४,९९९ रुपये असू शकते. त्याच वेळी, Realme 9 5G SE ची किंमत १७,९९९ रुपयांपासून सुरू होऊ शकते. डिव्हाइसेसची खरी किंमत दुपारी १२.३० च्या नंतरच समोर येईल. Realme 9 5G आणि Realme 9 5G SE ही दोन्ही डिव्हाइसेस फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आली आहेत. काय असतील वैशिष्ट्ये? १४४ Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले Realme 9 5G SE मध्ये उपलब्ध असेल. दोन्ही डिव्हाइसेस 5G सपोर्टसह येतील. Realme 9 5G मध्ये कंपनी MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देऊ शकते. तर, Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर 9 SE 5G मध्ये दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये ४८ MP मेन लेन्स कॅमेरा दिला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार , Realme 9 5G स्मार्टफोन स्टारगेझ व्हाईट, सुपरसोनिक ब्लू, सुपरसोनिक ब्लॅक आणि मेटियर ब्लॅक या चार रंगांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हँडसेट ६ GB रॅम आणि ८ GB RAM पर्यायासह १२८ GB पर्यंत स्टोरेज पर्यायासह येईल. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, Realme 9 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्याचा मुख्य लेन्स ४८ MP आहे. यात २ MP डेप्थ सेन्सर आणि २ MP मॅक्रो कॅमेरा मिळेल. फ्रंटमध्ये कंपनीने १६ MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iAkxd9C
Comments
Post a Comment