राहा तयार ! या दिवशी भारतात येणार OnePlus चा प्रीमियम स्मार्टफोन, मिळतील हे जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली: च्या ज्या प्रीमियम फोनची Smartphone Users आतुरतेने वाट पाहत आहे. तो, लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. आता कंपनीने त्याचा लाँच टीझर रिलीज केला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर OnePlus 10 Pro स्प्रिंग लाँच कन्फर्म झाले आहे. नवीन टीझरमध्ये लाँच तारखेबद्दल माहिती देण्यात नसली तरी युजर्सना नवीन अपडेट्ससाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, टिपस्टरने OnePlus 10 Pro च्या संभाव्य लाँच तारखेबद्दल माहिती शेअर केली होती. Tipster नुसार, OnePlus 10 Pro भारतात २२ किंवा २४ मार्च रोजी लाँच केला जाऊ शकतो. ही तारीख स्प्रिंग लाँच मध्ये येते. OnePlus 10 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. OnePlus चे नवीन डिवाइस OnePlus 9RT नंतर भारतातील कंपनीचे नवीन डिवाइस असेल. कंपनीने मागील वर्षी स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह OnePlus 9RT ला लाँच केले होते. वाचा: नवीन OnePlus 10 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हे हॅसलब्लाड कंपनीने सह-विकसित केले आहे. सध्या कंपनीने या फोनच्या दोन रंगांबद्दल सांगितले आहे. हे व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमराल्ड फॉरेस्ट कलर पर्यायांमध्ये सादर केले जाईल.नवीन OnePlus 10 Pro मध्ये 2K रिझोल्यूशनसह ६.७ इंचाची LTPO2 स्क्रीन आहे. त्याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट १२०Hz आहे. यात HDR 10+ आणि १३०० nits पर्यंत कमाल ब्राइटनेस आहे. कंपनी याला OxygenOS आधारित Android 12 सह सादर करू शकते. यामध्ये ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते. OnePlus 9RT फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. फोनचा मुख्य कॅमेरा ५० MP चा असेल. फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये ४ K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये १६ MP Sony IMX471 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus 9RT स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC चिपसेट सपोर्टसह येईल. फोन ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह Android 11 आधारित Oppo च्या ColorOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aVELdut

Comments

clue frame