बेस्टच ! या ब्रॉडबँड प्लान्समध्ये १८० दिवसांपर्यंतची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड डेटा आणि ३०० Mbps स्पीडसह 'इतका' डिस्काउंट

नवी दिल्ली: आजकाल इंटरनेटचा वापर प्रत्येक घरात होतो. स्मार्टफोनप्रमाणे इंटरनेट कनेक्शन देखील घरो-घरी सामान्य झाले असून वर्फ फ्रॉम होम किंवा इतर काही कामानिमित्त आता जवळ जवळ सगळीकडेच ब्रॉडबँड कनेक्शन वापरले जाते. विशेष म्हणजे, ब्रॉडबँड प्लान्स युजर्सना हाय-स्पीड इंटरनेटसह सर्वोत्तम डेटा लाभ देतात. तुम्हीही स्वत:साठी एक उत्तम ब्रॉडबँड प्लान्स शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देत आहो. आज आम्ही तुम्हाला Tata Play Fiber, आणि च्या सर्वोत्तम ब्रॉडबँडची संपूर्ण माहिती देणार आहो. या प्लानमध्ये तुम्हाला ३०० Mbps च्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा देखील दिला जात आहे. तसेच, १८० दिवस म्हणजेच ६ महिने चालणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतील. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला BSNL च्या प्लानमध्ये बिलावर ९० % (५०० रुपयांपर्यंत) सूटही मिळेल. वाचा: Tata Play Fiber च्या या प्लानमध्ये मिळतो २०० Mbps स्पीड: टाटा प्ले फायबर आपल्या युजर्सना ५५०० च्या प्लानमध्ये २०० Mbps स्पीड देत आहे. तुम्ही दीर्घ वैधता देणारा प्लान शोधत असाल, तर टाटा प्ले फायबरचा हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो . यामध्ये कंपनी १८० दिवसांची म्हणजेच ६ महिन्यांची वैधता देत आहे. कंपनी युजर्सना ८४०० रुपयांचा शानदार प्लान देखील देत आहे. टाटा प्ले फायबरचा हा प्लान ६ महिन्यांच्या वैधतेसह देखील येते. प्लानमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड ३०० Mbps आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळेल. युजर्ससाठी टाटा प्ले फायबरचा प्लान एक चांगला पर्याय ठरू शकतो. Jio फायबर ६ महिन्यांचा प्लान : जिओ फायबरचा ६ महिन्यांची वैधता असलेला प्लान ५,९९४ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये कंपनी १५० Mbps पर्यंत स्पीड देत आहे. या प्लानमध्ये कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय १५ दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. Jio Fiber च्या या प्लान तुम्हाला Amazon Prime Video आणि Disney + Hotstar सारख्या इतर अनेक OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. BSNL 6 महिन्यांच्या प्लानवर ५०० रुपयांपर्यंत सूट आहे. BSNL च्या ६ महिन्यांच्या वैधतेच्या योजनेचे नाव आहे फायबर प्रीमियम प्लस अर्धवार्षिक. प्लानमध्ये कंपनी २०० Mbps स्पीड आणि ३३०० GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लानमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड १५ Mbps पर्यंत खाली येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी या प्लानमध्ये ५०० रुपयांपर्यंत सूटही देत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jOmQEwg

Comments

clue frame