फक्त ९,९९९ रुपयात iPhone आणि ११ हजारात Pixel फोन खरेदीची संधी, ‘येथे’ स्वस्तात मिळतायत हँडसेट्स

नवी दिल्ली : तुम्ही जर आयफोन अथवा , गुगलचे फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व बजेट कमी असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर , सॅमसंग, आणि सारख्या ब्रँड्सचे रीफर्बिश्ड स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर दैनंदिन कामे, ऑनलाइन क्लासेस, कॉलिंग यासाठी कमी बजेटमधील फोन शोधत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी चांगले ठरतील. फ्लिपकार्टनुसार, रीफर्बिश्ड स्मार्टफोन्सला प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्याआधी अनेक क्वालिटी चेकमधून जावे लागते. हे फोन अगदी व्यवस्थित काम करतात. विशेष म्हणजे काही फोन्सवर वॉरंटी देखील मिळते. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: फ्लिपकार्टवर रिफर्बिश्ड iPhone 6s गोल्ड कलरचे ६४ जीबी व्हेरिएंट केवळ १०,८९९ रुपयात उपलब्ध आहे. यामध्ये टच आयडीसह ४.७ इंच रेटिना डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा फोन ए९ चिपसेटसह येतो. iPhone 6s चे १६ जीबी व्हेरिएंट फक्त ९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनला सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगात देखील खरेदी करू शकता. आयफोन ६ मॉडेलचे देखील रिफर्बिश्ड व्हर्जन उपलब्ध आहे. 8 आणि iPhone 7 रीफर्बिश्ड iPhone 8 गोल्ड कलरमधील ६४ जीबी व्हेरिएंट १७,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनमध्ये ४.७ इंच डिस्प्ले दिला असून, यात १२ मेगापिक्सल रियर आणि ७ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. तर ए११ बायोनिक चिपसेटचा देखील सपोर्ट दिली आहे. यात टच आयडी देखील आहे. तसेच, iPhone 7 देखील फक्त १४,५२९ रुपयात उपलब्ध आहे. यात iPhone 8 प्रमाणेच समान कॅमेरा आणि डिस्प्ले आहे. तसेच, ए१० फ्यूजन प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. आणि Pixel 3a रीफर्बिश्ड Google Pixel 3 XL चे ६४ जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवर १३,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनमध्ये ६.३ इंच QHD+ डिस्प्ले, रियरला १२.२ मेगापिक्सल आणि ड्यूल ८ मेगापिक्सल सेल्फी लेंस आहे. यात स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आणि ३४३० एमएएचची बॅटरी मिळते. फ्लिपकार्टवर Pixel 3a चे ६४ जीबी मॉडेल १०,७८९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनमध्ये ५.६ इंच FHD+ डिस्प्ले आणि ३ एक्सएल सारखे रियर लेंस आहे. परंतु, सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ३००० एमएएचची बॅटरी आणि क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ६७० चिपसेटचा सपोर्ट मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qTzNwuR

Comments

clue frame