iPhone 13 सारखा दिसणारा ‘हा’ स्मार्टफोन फक्त ५४९ रुपयात होईल तुमचा, ऑफर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल व जास्त पैसे खर्च करण्याची तयार नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, बजेटमुळे शक्य होत नाही. अशावेळेस तुम्ही अगदी सारखा दिसणारा रियलमीचा स्मार्टफोन खरेदी करू शकता. स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. या फोनला तुम्ही केवळ ५४९ रुपयात खरेदी करू शकता. रियलमीने काही दिवसांपूर्वीच Realme C35 ला लाँच केले आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन सारख्या डिझाइनसह येतो. याचा कॅमेरा सेटअप देखील आयफोनप्रमाणेच आहे. वाचा: Realme C35 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. या ४जी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या स्मार्टफोनला तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून ५४९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. Realme C35 स्मार्टफोनची लाँच किंमत १३,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर सध्या १४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ११,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर ११,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळत आहे. परंतु, या ऑफरचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तरच, पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास Realme C35 स्मार्टफोनला फक्त ५४९ रुपयात खरेदी करू शकता. तुम्ही एक्सचेंज ऑफरशिवाय देखील या स्मार्टफोनला खरेदी करू शकता. बँक ऑफरचा फायदा मिळाल्यास हा फोन स्वस्तात मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ६०० रुपये कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे फोनसाठी फक्त ११,३९९ रुपये खर्च करावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WaeHEm9

Comments

clue frame