नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी (BSNL) खासगी कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी अनेक शानदार प्लान्स आणत असते. याशिवाय कंपनीचा वेगवेगळ्या ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा देखील प्रयत्न असतो. मात्र, कंपनीची संपूर्ण देशभरात ४जी सर्विस उपलब्ध नाही. परंतु, आता लवकरच देशात ४जी सर्विस लाँच करणार आहे. कंपनी यावर्षी १५ ऑगस्टला आपली ४जी सर्विस लाँच करण्याच्या तयारीत आहे. BSNL याचवर्षी ४जी सोबतच नेटवर्क देखील लाँच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच ५जी नेटवर्क देखील वापरता येऊ शकतो. वाचा: BSNL ५जी नेटवर्कला Non-Standalone (NSA) मोडमध्ये १५ ऑगस्टला लाँच करेल. यात विना एंड-टू-एंड नेटवर्क ५जी सर्विस दिली जाईल. याचा वापर ऑपरेटर्सद्वारे सुरुवाती टप्प्यात केला जातो. ऑपरेटर्स ४जी इंफ्रास्ट्रक्चरद्वारे ५जी सर्विस उपलब्ध करतात. परंतु, याच्या काही मर्यादा देखील आहेत. ETTelecom च्या रिपोर्टनुसार, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सच्या (सी-डॉट) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, प्रूफ ऑफ कांसेप्ट (PoC) वर काम करत आहे. C-DoT चे चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, ५जी वर सध्या काम सुरू आहे. 5G NSA बद्दल सांगायचे तर कंपनी ऑगस्ट २०२२ पर्यंत लाँच करेल. ही ४जी प्लस ५जी सर्विस असेल. NSA कोर यावर्षाच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत तयार होईल. त्यांनी पुढे सांगितले की, SA सर्विसला यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत सुरू केले जाईल. यावर्षी ऑगस्टपर्यंत ५जी एनएसए सर्विस, तर पुढील वर्षी 5G SA सर्विस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्सचे दर वाढवले होते. त्यानंतर अनेक ग्राहकांनी बीएसएनएलला पसंती दिली आहे. रिपोर्टनुसार, BSNL ला याचा फायदा देखील झाला आहे. कमी किंमतीतील प्लान्समुळे ग्राहक BSNL ची निवड करत आहे. आता ग्राहक ४जी सर्विसची वाट पाहत आहेत. जेथे नेटवर्क चांगले आहे तेथे ग्राहक Airtel आणि Jio च्या तुलनेत BSNL ला पसंती देत आहे. त्यामुळे ४जी सर्विस लाँच केल्यानंतर BSNL इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SY1w2un
Comments
Post a Comment