प्रत्येकाच्या फोनमध्ये असायलाच हवेत ‘हे’ सरकारी अ‍ॅप्स, महत्त्वाची कागदपत्रं-सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी येतील उपयोगी

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे सहज शक्य झाली आहेत. प्रत्येक कामासाठी फोनमध्ये एक उपलब्ध असतो. अनेक भारतीय अ‍ॅप्सची देखील लोकप्रियता वाढली आहे. अनेक सरकारी अ‍ॅप्स देखील आहेत, जे प्रत्येकाच्या फोनमध्ये असायलाच हवेत. या सरकारी अ‍ॅप्सच्या मदतीने अनेक कामे सहज शक्य होतात. या सरकारी अ‍ॅप्सला तुम्ही आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरवरून मोफत डाउनलोड करू शकता. सरकारद्वारे अनेक वेगवेगळ्या कामांसाठी अ‍ॅप्स उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये , , , आणि या अ‍ॅप्सचा समावेश आहे. या अ‍ॅप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: M Aadhaar आणि My Gov यूआयडीएआयद्वारे जारी केले जाणारे M Aadhaar हे खूपच कामाचे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक सुविधा मिळतात. तुम्ही आधार कार्डला डिजिटल फॉर्मेटमध्ये सेव्ह करू शकता. तसेच, बायोमेट्रिक माहिती देखील सुरक्षित ठेवता येईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड देखील दाखवू शकता. तसेच, My Gov अ‍ॅप देखील तुमच्या फोनमध्ये असायलाच हवे. याद्वारे तुम्ही सरकारी विभाग आणि मंत्रालयाने सुचना देवू शकता. कोणत्या योजनेवर तुमची कल्पना देखील सरकारला सुचवू शकता. हे अ‍ॅप देखील मोफत उपलब्ध आहे. mPARIWAHAN आणि UMANG या अ‍ॅपमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डिजिटल कॉपी म्हणून सेव्ह करू शकता. या डिजिटल कॉपीला कायदेशीर मान्यता आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सेकंड हँड गाडीची माहिती देखील तपासू शकता. तसेच, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास UMANG अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असायलाच हवे. या अ‍ॅपच्या माध्यमातून EPF, पॅन, आधार, डिजिलॉकर, गॅस बुकिंग, मोबाइल बिल पेमेंट आणि वीज बिल पेमेंट इत्यादी सेवांचा लाभ मिळेल. या अ‍ॅपला मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि नॅशनल ई-गव्हर्नेंस डिव्हिजनने मिळून तयार केले आहे. DigiLocker DigiLocker हे असे अ‍ॅप आहे, जे प्रत्येकाच्या फोनमध्ये असायलाच हवे. या अ‍ॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपची साइज ७.२ एमबी आहे. तुम्ही या अ‍ॅपमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्डला डिजिटल फॉर्मेटमध्ये सेव्ह करू शकता. यात तुम्ही आपल्या कॉलेजचे सर्टिफिकेट देखील सेव्ह करू शकता. यामुळे महत्त्वाची कागदपत्रं हार्ड कॉपी स्वरूपात नेहमी सोबत बाळगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, हे सर्व अ‍ॅप्स तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/I54OLch

Comments

clue frame