रेडमी स्मार्टफोनच्या किंमतीत खरेदी करा हा आयफोन, स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर

नवी दिल्लीः iPhone SE (2020) एसई (२०२०) ला खरेदी करण्याची एक जबरदस्त संधी आहे. आयफोन एसई (२०२०) च्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटला तुम्ही फक्त १५ हजार ४९८ रुपयांपर्यंतच्या किंमतीत खरेदी करू शकता. ही ऑफर फ्लिपकार्टवर मिळत आहे. अॅपलचा सर्वात आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या या फोनवर देण्यात येत असलेल्या ऑफर्ससंबंधी. iPhone SE (2020) च्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची फ्लिपकार्टवर ओरिजनल किंमत ३० हजार २९८ रुपये आहे. परंतु, या फोनला तुम्ही १५ हजार ४९८ रुपयात खरेदी करू शकता. जर या फोनला स्वस्त किंमतीत खरेदी करायचे असेल तर यावर १४ हजार ८०० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर नंतर याची किंमत १५ हजार ४९८ रुपये होते. एक्सचेंज व्हॅल्यू कोणत्याही स्मार्टफोनच्या कंडिशन वर अवलंबून असते. या डील अंतर्गत मॅक्सिमम १४ हजार ८०० रुपयांची व्हॅल्यू मिळवता येते. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळतो. सोबत ५० रुपयाचा इंस्टेंट कॅशबॅक पेटीएम वॉलेटवर मिळतो. iPhone SE (2020) मध्ये तुम्हाला ४.७ इंचाचा Retina HD (750x1,334 pixels) IPS LCD स्क्रीन मिळतो. हा स्मार्टफोन A13 Bionic चिपसेट वर काम करतो. यात 12MP चे सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. जो optical image stabilisation (OIS) सोबत येतो. फोनमध्ये तुम्हाला ६० एफपीएस स्पीडवर ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑप्शन मिळतो. फ्रंट मध्ये कंपनी ने ७ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा मिळतो. या फोनला ब्लॅक, व्हाइट, रेड अशा तीन कलर मध्ये खरेदी करू शकता. अॅपल ८ मार्च रोजी लाँच होणाऱ्या नवीन आयफोन एसईला लाँच करू शकते. ५जी सपोर्ट सोबत येईल. कंपनीने हे स्पष्ट केलेले नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TlzCjHc

Comments

clue frame